Swachh Bharat mission Tadoba forest । ताडोबा व्याघ्र प्रकल्पात स्वच्छतेचा अनोखा संदेश; पर्यटक व ग्रामस्थांचा सहभाग

Swachh Bharat mission Tadoba forest

Swachh Bharat mission Tadoba forest : चंद्रपूर 2 ऑक्टोबर 2025: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सर्व वनपरिक्षेत्र कार्यालयांमध्ये आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ताडोबा व भोवतालच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत वनविभागाचे अधिकारी, वनरक्षक व इतर कर्मचारी, जिप्सी चालक, मार्गदर्शक, ईडीसी सदस्य व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. Tadoba Gandhi Jayanti celebration 2025

४ तासात आरोपीला अटक, मास्टरमाइंड वाहनचालक

शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी

महात्मा गांधी यांच्या साधेपणा व सेवाभाव या मूल्यांची जोपासना करत मोहर्ली, कोळसा, खडसंगी, शिवणी, कारवा, चोडमपल्ली यांसह विविध कार्यालयांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच आगरझरी फुलपाखरु उद्यान, जुनोना, नवेगाव, अलिझंजा, सिरकाडा, पांगडी, झरी या निसर्ग पर्यटन प्रवेशद्वारांच्या परिसरातील कचराही गोळा करण्यात आला. मोहर्ली, शिवणी, नलेश्वर, चकबामणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून स्वच्छतेचे महत्व विषद करण्यात आले.

tadoba gandhi jayanti


याशिवाय मुधोली, शिवणी व अन्यत्र मानव-वन्यजीव संघर्षाबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. आगरझरी येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. निमढेला येथे जिप्सी चालक, मालक व मार्गदर्शक यांच्या श्रमदानातून पर्यटन रस्ता दुरुस्त करण्यात आला. कळमगाव, तुकूम, मोहाळी येथे ग्रामस्थांना धूरविरहित चुलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांमधून वन्यजीव संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वततेसाठी सामूहिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

Leave a Comment