Bhadrawati crime news : चंद्रपूर/भद्रावती २७ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या नगरपरिषद निवडणुकीचा धुरळा सुरु आहे, अनेक ठिकाणी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी चुरस वाढली आहे. या चुरशीदरम्यान भद्रावती शहरात २२ वर्षीय तरुणाने हातात तलवार बाळगत परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम करीत होता, भद्रावती पोलिसांच्या सतर्कतेने त्या तरुणाला हिसका दाखवीत अटक केली.
हे हि वाचा – चंद्रपूर जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकाचं नराधमी कृत्य
निवडणुकीच्या रणधुमाळीत भद्रावती शहरात २२ वर्षीय प्रज्वल अशोक कोडापे राहणार शिवाजी नगर हा तरुण सुमठाणा चौकात हातात तलवार बाळगून परिसरात दहशत निर्माण करीत होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच शहानिशा करण्यात आली. पोलिसांनी प्रज्वल कोडापे ला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक तलवार जप्त करण्यात आली.
जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) अनव्ये शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल असे शस्त्र बाळगण्यास मनाई असताना आरोपी प्रज्वल कोडापे यांनी अआदेशाचे उल्लंघन केले असून त्याच्यावर कारवाई करीत ताब्यात घेण्यात आले. आरोपी प्रज्वल कडून लोखंडी तलवार किंमत १ हजार जप्त करण्यात आली. Bhadrawati crime news
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल आतकुलवार, जगदीश झाडे, अनुप आष्टुन्कर, विशवनाथ चुदरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे, रोहित चिटगिरे व संतोष राठोड यांनी केली.
