BJP candidate post of Municipal President
BJP candidate post of Municipal President : घुग्घूस 17 नोव्हेम्बर (News34) : घुग्घूस नगरपरिषद निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, अंतिम टप्प्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी आपल्या अधिकृत उमेदवार म्हणून शारदा उर्फ पूजा दुर्गम यांची निवड जाहीर केली आहे.
Read Also : चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक, भाजपकडे इच्छुकांची गर्दी
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, घुघूस शहर अध्यक्ष संजय तिवारी यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शारदा दुर्गम या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व स्थानिक प्रश्नांवर सक्रिय असून, स्थानिक महिलांमध्ये त्यांचा चांगला संपर्क व कार्याचा ठसा असल्याने पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. BJP candidate post of Municipal President
घुघूस शहरातील पाणीपुरवठा, रस्ते-विकास, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी अशा विविध प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी सक्षम व पारदर्शक नेतृत्व आवश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. घुघूसच्या सर्वांगीण विकासासाठी शारदा दुर्गम यांना नगराध्यक्षपदासाठी आम्ही अधिकृत उमेदवार म्हणून पुढे केले आहे. लोकांना विश्वास देणारे नेतृत्व देणे हाच उद्देश आहे, असेही ते म्हणाले.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शारदा दुर्गम यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. घुघूस नगरपरिषद निवडणुकीत आता भाजपने उमेदवारी स्पष्ट केल्याने राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. इतर पक्ष आणि उमेदवारांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
