Chandrapur Illegal Cattle Transport Case : चंद्रपूर २७ नोव्हेम्बर (News३४) – गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीवर बंदी असताना सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात याप्रकारची वाहतूक बेभामपणे सुरु आहे. २६ नोव्हेम्बर रोजी विरूर पोलिसांनी गोवंशीय जनावरांची क्रूरपणे होत असलेल्या वाहतुकीवर कारवाई करीत तब्बल ७ गोवंशीय जनावरांची सुटका करीत २ आरोपीना अटक केली आहे.
हे वाचा – निवडणुकीच्या रणधुमाळीत युवकाने काढली तलवार आणि….
२६ नोव्हेम्बर रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर मौजा अंतरंगाव वनतपासणी नाक्यावर नाकाबंदी करीत महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH३४ BZ ७६९१ ला थांबविण्यात आले. वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये ७ गोवंशीय जनावर आढळले, त्या जनावरांना अत्यंत निर्दयीपणे कोंडून तेलंगणा राज्यात नेल्या जात होते.
पोलिसांनी ७ गोवंशीय जनावरांची सुटका करीत आरोपी ३१ वर्षीय शेख शाहरुख शेख मेहबूब व २९ वर्षीय सोहेल अहमद शेख हुसेन दोन्ही राहणार मौलाना आझाद वार्ड बल्लारपूर यांना अटक करण्यात आली. गोवंशीय जनावरे व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ९ लक्ष २५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीवर विरूर पोलीस ठाण्यात कलम ५(ब), ९,११ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सहकलम ११ (१)(सी) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात सपोनि संतोष वाकडे, पोलीस कर्मचारी अफसर पठाण, विभीषण खटके, भूषण इटनकर , राहुल वैद्य व अविनाश बोरूले यांनी केली.
