Congress Vanchit alliance municipal elections
Congress Vanchit alliance municipal elections : ब्रह्मपुरी १७ नोव्हेम्बर (News३४) – संपूर्ण राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असताना आज नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिनी राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारों कार्यकर्त्यांच्या साक्षीने ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी प्रणित पॅनलचे नगराध्यक्ष पदासह एकूण २४ उमेदवारांचे नामांकन दाखल करण्यात आले.
Read Also : माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी ला मुदतवाढ द्या – आमदार मुनगंटीवार
आज सकाळपासूनच संपूर्ण ब्रह्मपुरी शहरांमध्ये नामांकन दाखल करण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.तर आज नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिनी विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी येथील जनसंपर्क कार्यालय ते नगरपरिषद कार्यालय पर्यंत हजारोंच्या संख्येने उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेते, तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात पदयात्रा काढून नगराध्यक्ष व नगरसेवक पदाकरिता नामांकन दाखल करण्यात आले. ब्रह्मपुरी शहरात स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाची आघाडी झाल्याने आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी देखील नामांकन अर्ज सोबतच दाखल केले. Congress Vanchit alliance municipal elections

यात नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून योगेश मिसार यांनी नामांकन दाखल केले. तर नगर सेवक पदाकरीता प्रभाग १ (अ)सौ. काजल राजेश तलमले, (ब)चंद्रकांत ज्ञानेश्वर बावनकुळे, प्रभाग २ (अ)सौ. बबीता किशोर आमले,(ब)प्रकाश शामराव खोब्रागडे, प्रभाग ३ (अ)मनोज प्रभाकर कावळे (ब) सौ. रेणुताई राहुल ठेंगरी, प्रभाग ४ (अ) डॉ.प्रेमलाल मेश्राम (ब) सौ. जयश्री दिलीप कुथे,
प्रभाग ५ (अ)सतिश ज्ञानेश्वर हुमने,(ब)सौ. रंजना नंदू पिसे, प्रभाग ६ (अ) हेमलता सिंहगडे (ब) जगदिश नंदूजी पिलारे, प्रभाग ७ (अ) गिता मेश्राम (ब)सचिन केवळराम राऊत, प्रभाग ८ (अ) पुष्पलता सुधाकर पोपटे,(ब)नितीन जनार्धन उराडे, प्रभाग ९ (अ)अनिल श्रीराम दोनाडकर, (ब)सौ. सपना संजय बल्लारपूरे, प्रभाग १० (अ) राकेश रामचंद्र पडोळे, (ब)सौ. ज्योती मुकुंदा राऊत, प्रभाग ११ (अ) सौ. माधुरी सोमेश्वर उपासे, (ब) सौ. रंजना गिरीश बुराडे, (क) सारंग रमेश बनपुरकर या उमेदवारांच्या समावेश आहे. Congress Vanchit alliance municipal elections
काँग्रेस व वंचित आघाडीच्या उमेदवारांची नामांकन दाखल करतेवेळी प्रामुख्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर , प्रदेश सचिव डॉ. थानेश्वर कायरकर, जिल्हा बँक संचालक दामोदर मिसार, जिल्हा काँग्रेस सचिव वासु सोंदरकर, ऋषींजी राऊत, फाल्गुन राऊत, सोनू नाकतोडे, गाजी पटेल, इकबाल जेसानी, माजी नगराध्यक्ष वनिता ठाकूर, बालू पिसे, संजय ठाकूर, अण्णा ठाकरे,महिला काँग्रेस शहराध्यक्ष योगिता आमले, कृऊबा उपसभापती सुनीता तिडके वंचित बहुजन आघाडीचे नेते लिलाधर वंजारी, तथा तालुका काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
