चंद्रपूरमध्ये मातृत्व व बालआरोग्यासाठी किलकारी मोफत सेवा सुरु

गर्भवती महिला आणि बालआरोग्यासाठी भारत सरकारची मोफत ऑडिओ कॉल सेवा – किलकारी

Kilkari audio messages for new mothers : चंद्रपूर 27 नोव्हेंबर (News३४) – मातृत्व व बालआरोग्य सशक्त करण्याच्या दिशेने केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत किलकारी ही मोबाईल-आधारित मोफत स्वास्थ्य सेवा देशभर प्रभावीपणे कार्यरत आहे. या सेवेमधून गरोदर महिला व एक वर्षाखालील बाळ असलेल्या कुटुंबांना त्यांच्या मोबाईलवर स्थानिक भाषेत (मराठीसहित) आठवड्यातून 1 वेळा आरोग्यविषयक मार्गदर्शन ऑडिओ कॉलद्वारे दिले जाते.

क्राईम – गोवंशीय जनावरांची वाहतूक, २ आरोपीना अटक

कोण लाभ घेऊ शकतो?

किमान 4 महिन्यांची नोंदणी झालेली गर्भवती महिला
तसेच 1 वर्षाखालील बाळ असलेली कुटुंबे
कॉल कोणत्या क्रमांकावरून येईल?
या सेवेचे सर्व अधिकृत कॉल 1600403660 या फोन क्रमांकावरून येतात. नागरिकांनी हा क्रमांक आजच आपल्या मोबाईलमध्ये जतन (Save) करून ठेवावा, जेणेकरून कॉल सहज ओळखता येईल आणि महत्त्वाचा संदेश ऐकणे चुकू नये. येणारा कॉल हा ३ ते ५ मिनिटांचा असुन पुर्ण कॉल ऐकणे आवश्यक आहे.  


गरोदर महिलेला कॉल कधीपासून येतात?
गर्भधारणेच्या 13 व्या आठवड्यापासून (किंवा अंदाजे 4 थ्या महिन्यापासून) गरोदर महिलेला किलकारीचा फोन आठवड्यातून 1 वेळा येण्यास प्रारंभ होतो.
तसेच बाळ 1 वर्षाचे होईपर्यंत हे कॉल नियमितपणे प्राप्त होत राहतात.
कॉल चुकला तर काय?
एखादा कॉल नागरिकांकडून चुकल्यास, किंवा पुन्हा ऐकायचा असल्यास, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 14423 हा नंबर डायल करून त्याच आठवड्याचा किलकारी संदेश अगदी मोफत पुन्हा ऐकता येतो.


किलकारी संदेशात काय असते?
गरोदर महिलेच्या गर्भावस्थेच्या महिन्यानुसार आवश्यक आरोग्य सूचना
उदा. जर एखादी महिला 5 व्या महिन्यात असेल, तर तिला 5 व्या महिन्यात अपेक्षित मार्गदर्शनच दिले जाते.
त्याचप्रमाणे, बाळाच्या वयानुसार दर आठवड्याला बाळाच्या आरोग्य व देखभालीबाबत मार्गदर्शन दिले जाते.
संदेशामध्ये आहार, औषधोपचार, नियमित तपासणी, लसीकरण, आजार प्रतिबंध, आरोग्यसवयी, आणि काळजी घेण्याच्या आवश्यक टिप्सचा समावेश असतो.


सेवा सुरू करण्यासाठी नोंदणी कशी करावी?
आपल्या भागातील आशा सेविका, ए.एन.एम. आरोग्य कर्मचारी किंवा जवळील शासकीय आरोग्य केंद्रात जा.
गर्भधारणा किंवा बाळाच्या जन्माची अधिकृत नोंदणी करून घ्या.
नोंदणी करताना तोच मोबाईल क्रमांक द्या ज्यावर तुम्हाला किलकारीचे कॉल प्राप्त करायचे आहेत.
ही माहिती ऑनलाइन आर.सी.एच. प्रणाली मध्ये नोंदवली जाईल आणि त्यानंतर कॉल्स आपोआप सुरू होतील.


सेवेचा मुख्य उद्देश –
किलकारी सेवेमुळे गरोदर महिला, नवमाता, बाळ, आणि त्यांचे कुटुंब आरोग्यदृष्ट्या जागरूक होऊन निरोगी व आनंदी जीवन जगण्यास सक्षम बनतात. ही सेवा संपूर्णपणे मोफत असून, नागरिकांनी तिचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी –
नागरिकांनी जवळील शासकीय आरोग्य केंद्र किंवा आशा व एएनएम आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Leave a Comment