lcb chandrapur arrests illegal scrap gang
lcb chandrapur arrests illegal scrap gang : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News 34) – दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत अवैधरित्या लोखंडी भंगाराची चोरी आणि वाहतूक करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे. बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावर ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये पिकअप वाहनासह सुमारे ७ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Read Also : चोरीच्या भीतीने दागिने ठेवले वाहनात, १७ लाखांचे दागिने लंपास
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावरून अवैधरित्या लोखंडी भंगार चोरीची वाहतूक सुरू आहे. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून पिकअप वाहन क्रमांक MH 34 BZ 8653 ला ताब्यात घेतले.
या कारवाईत एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे. सर्व आरोपी चंद्रपूर येथील रहिवासी आहेत: दुर्गेश तुळशीराम भागडे (वय २१), रोशन उमेश भोयर (वय २१), कृष्णा संजय गदईकर (वय १९), अशोक बनेश झाडे (वय ४१), दिवाकर तुळशीराम भागडे. याशिवाय, साबिर शेख नामक एक आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. lcb chandrapur arrests illegal scrap gang
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
पोलिसांनी आरोपींकडून खालीलप्रमाणे एकूण ₹ ७,८२,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे: पिकअप वाहन (क्र. MH 34 BZ 8653) ५,००,०००/-, लोखंडी भंगार (२५०० किलो) २,५०,०००/-, गॅस कटर सिलेंडर (०३ नग) ३०,०००/-, घरगुती सिलेंडर २,०००/-.
याप्रकरणी आरोपींवर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे कलम १२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर च्या पथकाने केली. कारवाई पथकात PSI संतोष निंभोरकर, PSI सुनील गौरकर, ASI धनराज करकाडे, HC गणेश भोयर, संतोष येलपुलवार, PC सुमित बरडे, आणि प्रफुल गारघाटे यांचा समावेश होता.
