Matoshri Gram samruddhi rural road scheme
Matoshri Gram samruddhi rural road scheme : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News 34) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील 100 पेक्षा अधिक पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीची सोय मोठ्या प्रमाणात सुधारेल तसेच शेतीमाल वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.
Read Also : चारचाकी वाहनात दागिने ठेवणे पडले महागात, चोराने डाव साधला
आतापर्यंत ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांना पावसाळ्यात चिखल, पाणथळ आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे शेतात जाणे कठीण व्हायचे. त्यामुळे शेती उत्पादन खर्च वाढत होता आणि वेळेवर शेतीकामे करण्यास अडथळे येत होते. मंजूर झालेल्या पाणंद रस्त्यांमुळे आता शेतकरी बांधवांचा श्रम व वेळ दोन्ही वाचणार असून पीक उत्पादन बाजारात नेण्याचे मार्गही सुकर होणार आहेत. या मंजुरीने ग्रामीण जनतेत मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे. Matoshri Gram samruddhi rural road scheme
या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आभार व्यक्त केले आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील गावोगाव रस्ताविकासाचा प्रश्न जलद गतीने मार्गी लागत असून ग्रामीण भागात सर्वांगीण प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
या मंजूर पाणंद रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचवण्याचा दृढ संकल्प यामधून दिसून येतो. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा, विकासाचे नवे दालन उघडणारा हा निर्णय कृषी आणि ग्रामविकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या दैनंदिन श्रमांना मदत होणे आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी सुविधा मिळणे ही सरकारची जबाबदारी आहे. या पाणंद रस्त्यांच्या मंजुरीमुळे ग्रामीण भागातील विकासाला मोठी चालना मिळणार असून शेतकऱ्यांना वास्तविक दिलासा मिळेल. Matoshri Gram samruddhi rural road scheme
माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचवण्याचा दृढ संकल्प आम्ही केला आहे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. ही मंजुरी ही फक्त सुरुवात आहे. पुढील काळातही ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात अधिकाधिक विकासकामे होत राहतील,” अशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.
