MLA vs ex corporator argument video । MLA विरुद्ध माजी नगरसेवक! रस्त्याच्या कामावरून रयतवारीत तुफान वाद

MLA vs ex corporator argument video

MLA vs ex corporator argument video : चंद्रपूर १८ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर शहरातील रयतवारी भागात रस्त्याच्या कामावरून आमदार जोरगेवार व कांग्रेसचे माजी नगरसेवक राजेश अडूर हे दोघे भिडल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमात सर्वत्र व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये राजेश अडूर यांनी २०० युनिट बाबत विचारले असता आमदार जोरगेवार यांचा चांगलाच पारा चढला.

Read Also : प्रेम प्रकरण चिघळले, प्रियकराने केली प्रेयसीच्या पतीची हत्या, चंद्रपूर हादरले

महाविकास आघाडी सरकारच्या काळात रयतवारी भागातील रस्ता मंजूर करण्यात आला होता, मात्र कामात विलंब झाला, काही महिन्यांनी सरकार कोसळले, शिंदे सरकार सत्तेवर आली आणि महाविकास आघाडी सरकारमधील कामे थांबविण्यात आली, त्याबाबत अडूर यांनी पाठपुरावा करीत रस्त्याचे काम सुरु केले, मात्र रस्त्याचे काम पूर्णत्वास येत असताना आमदार जोरगेवार कार्यकर्त्यांसह त्याच रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कामासाठी पोहचले.

भूमिपूजन कार्यक्रम स्थळी जोरगेवार दाखल झाले असता अडूर आपल्या समर्थकांसह पोहोचले आणि भूमिपूजन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली, आधी जोरगेवार यांनी शांतपणे म्हणणे ऐकून घेतले. शासनाचे काम असल्याने व माझ्या विधानसभेतील विकासकाम असल्याने मी भूमिपूजन करण्यासाठी याठिकाणी आलो असे सांगितले. मात्र अडूर यांनी तटस्थ भूमिका घेत कार्यक्रम होऊ देणार नाही यावर ठाम राहिले. MLA vs ex corporator argument video

वाद वाढत गेला आणि अडूर यांनी आमदार जोरगेवार यांच्या २०० युनिट बाबत प्रश्न उपस्थित करीत आधी ते आश्वासन पूर्ण करा असे म्हटले असता जोरगेवार यांचा पारा चढला, शाब्दिक चकमक वाढत गेली, २०० युनिट पाहिजे असेल तर न्यायालयात जाऊन केस कर मी माझे उत्तर देतो असे जोरगेवार म्हणाले. मी जाणार न्यायालयात आणि जाब विचारणार असे उत्तर अडूर यांनी दिले.

वाद व शाब्दिक चकमकीत भूमिपूजन पार पडले मात्र रयतवारी मधील नागरिकांना रस्त्याच्या कामासाठी आमदार जोरगेवार व माजी नगरसेवक अडूर रस्त्यावर भिडल्याचे दृश्य मनोरंजक दृश्य म्हणून आनंद घेऊ लागले, शाब्दिक चकमकीचा हा व्हिडीओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ही राजकीय स्टंटबाजी – आमदार जोरगेवार

सदर कार्यक्रम हा शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे होता, जेव्हा शासन काही कार्यक्रमाचे आयोजन करते त्यावेळी सर्व जनप्रतिनिधींना नियमाप्रमाणे आमंत्रण दिले जाते, माझ्या विधानसभा क्षेत्रातील कार्यक्रम असल्याने मला जावे लागले, मनपा निवडणूक असल्याने अडुर यांनी राजकीय स्टंटबाजी केली.

Leave a Comment