Nagar Parishad election candidature scrutiny
Nagar Parishad election candidature scrutiny : चंद्रपूर १९ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व एक नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन करीत आपली ताकद दाखवली. १८ नोव्हेम्बर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली यामध्ये तब्बल २०० जणांचे अर्ज अवैध ठरले आहे.
Read Also : चंद्रपुरात राजशिष्टाचाराची खिल्ली, खासदार धानोरकरांनी विचारला जाब
अर्ज परत घेण्याची तारीख 21 नोव्हेंबर तर अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटपसह, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार. जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत अनेक बंड झाले, काही ठिकाणी राष्ट्रीय पक्षाला उमेदवार मिळेनासे झाल्याने चांगलीच नामुष्की ओढवली होती.
सदस्यपदासाठी १० नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकूण १ हजार ५४७ अर्ज तर अध्यक्षपदासाठी एकूण १२१ अर्ज दाखल झाले होते. अध्यक्षपदासाठी आलेल्या अर्जाची छानणी झाल्यावर ९१ अर्ज वैद्य ठरले तर ३० अर्ज हे अवैध ठरले. सदस्यपदासाठी १ हजार ३४७ अर्ज वैद्य ठरले तर २०० अर्ज अवैध ठरले आहे. २१ ते २५ नोव्हेम्बर पर्यंत अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे, त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार आहे ते ठरेल. Nagar Parishad election candidature scrutiny
कुठे किती अर्ज बाद?
बल्लारपूर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकूण ११ अर्ज दाखल, वैद्य अर्ज ११, सदस्य अर्ज २१० , वैद्य अर्ज १९९ तर अवैध अर्ज ११, भद्रावती नगरपरिषद – नगराध्यक्ष एकूण अर्ज १०, वैद्य ७, अवैध अर्ज ३, सदस्य अर्ज १८१ वैद्य अर्ज १४८ तर अवैध अर्ज ३३, वरोरा नगरपरिषद – नगराध्यक्ष पदासाठी एकूण अर्ज ९, वैद्य अर्ज ७, अवैध अर्ज ३, सदस्यपदासाठी एकूण अर्ज १७१, वैद्य अर्ज १५८, अवैध अर्ज १३, ब्रह्मपुरी नगरपरिषद – अध्यक्षपदासाठी एकूण अर्ज ५, वैद्य अर्ज ४, अवैध अर्ज १, सदस्यपदासाठी एकूण अर्ज १०५ तर वैद्य अर्ज १००, ५ अर्ज बाद, मूल नगरपरिषद अध्यक्षपदासाठी दाखल एकूण अर्ज ९, अर्ज वैद्य ६ , बाद झालेल्या अर्जाची संख्या ३, सदस्यपदासाठी दाखल झालेले अर्ज ११२, वैद्य अर्ज ९५, बाद झालेले एकूण १७ अर्ज.
राजुरा नगरपरिषद नगराध्यक्ष अर्ज – ९, वैद्य अर्ज ९, सदस्यपदासाठी एकूण अर्ज ८८, १ अर्ज बाद, घुग्गुस नगरपरिषद एकूण नगराध्यक्ष अर्ज दाखल १३, वैद्य अर्ज ६, बाद झालेले अर्ज ७, सदस्यपदासाठी दाखल अर्ज १५९, वैद्य अर्ज १३६, २३ अर्ज बाद. गडचांदूर नगरपरिषद नगराध्यक्ष अर्ज दाखल – ११, वैद्य अर्ज १० बाद झालेला अर्ज १, सदस्यपदासाठी दाखल अर्जाची संख्या १३७, वैद्य अर्ज १२६, एकूण बाद अर्ज ११.
नागभीड नगरपरिषद अध्यक्ष अर्ज १६, वैद्य अर्ज १२, बाद अर्ज ४, सदस्यपदासाठी अर्ज १२३, वैद्य अर्ज ९५, बाद अर्ज २८, चिमूर नगरपरिषद अध्यक्ष अर्ज – १३, वैद्य अर्ज ८, बाद अर्ज ५, सदस्यपदासाठी अर्ज – २००, वैद्य अर्ज १४८, बाद अर्ज ५२, भिसी नगरपंचायत अध्यक्ष अर्ज – १५, वैद्य अर्ज ११, बाद अर्ज ४, सदस्यपदासाठी दाखल एकूण अर्ज – ६१, वैद्य अर्ज ५५, बाद अर्ज ६. Nagar Parishad election candidature scrutiny
नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये एकूण 133 प्रभाग असून निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या 253 आहे. एकूण मतदार 3 लक्ष 71 हजार 537 असून पुरुष मतदार 1 लक्ष 87 हजार 139 व स्त्री मतदार 1 लक्ष 84 हजार 387 सह अन्य मतदारांची संख्या 11 आहे.
