Police arrest news reporters extortion gang
Police arrest news reporters extortion gang : चंद्रपूर ६ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या बोगस पत्रकारांचा सुळसुळाट वाढला असून ज्यांना लिहता वाचता येत नाही असे गुन्हगेरे प्रवृत्ती या क्षेत्रात अवतरली आहे. अश्याच काही भामट्या पत्रकारांना रामनगर पोलिसांनी हिसका दाखवीत अटक केली आहे. त्यांनी देहविक्री करण्याऱ्या महिलेकडून १ लाख रुपयांची खंडणी मागितली. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजात चांगलं व वाईट दाखविण्याचा त्याचा प्रयत्न असतो मात्र भामटे पत्रकार समाजाच्या आरश्याला बट्टा लावण्याचे काम करीत आहे.
Also Read : चंद्रपूर पोलिसांनी बल्लारपुरातील गुन्हेगारी टोळीवर लावला मकोका
३ नोव्हेम्बर रोजी चंद्रपूर शहरात देहविक्री करणाऱ्या महिलेच्या घरात ६ भामट्या पत्रकारांनी धडक देत छापा मारला, तू देहविक्री चा व्यवसाय करते जर हि बाब बाहेर आली तर तुझी बदनामी होणार, आम्हाला १ लाख रुपये दे अन्यथा आम्ही याची बातमी प्रकाशित करणार अशी धमकी त्या महिलेला देण्यात आली. फिर्यादी महिलेने भामट्या पत्रकारांना १ लाख रुपये दिले.
मात्र फिर्यादी महिलेने याबाबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगत तक्रार दिली, रामनगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करीत पत्रकारांच्या या टोळक्याचा शोध सुरु केला, या प्रकरणी पोलिसांनी (सत्यशोधक न्यूज मुख्य संपादक) ५७ वर्षीय राजू नामदेवराव शंभरकर राहणार लालपेठ चंद्रपूर, (इंडिया २४ न्यूज, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी) ३७ वर्षीय कुणाल यशवंत गर्गेलवार राहणार विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर, (दैनिक विदर्भ कल्याण, तालुका प्रतिनिधी) ३३ वर्षीय अविनाश मनोहर मडावी राहणार इंदिरानगर चंद्रपूर व (भारत टीव्ही न्यूज चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी) ५६ वर्षीय राजेश नारायण निकम राहणार जमणजेट्टी पाटील वाडी चंद्रपूर यांना अटक केली. या प्रकरणी सचिन ढगे व योगिता पाटेकर हे पसार झाले आहे. female sex worker blackmail by journalists
यामध्ये कुणाल गर्गेलवार यांच्यावर घरफोडी व चोरीचे गुन्हे असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीवर कलम ३०८ (५), ३३३, ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि जिल्ह्यात कुणीही पत्रकार किंवा पोलीस असल्याची बतावणी करून लूटमार किंवा खंडणी मागत असेल तर तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा डायल ११२ वर संपर्क करावा.
सदरची यश्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि निलेश वाघमारे, देवाजी नरोटे, हनुमान उगले, पोलीस कर्मचारी जितेंद्र आकरे, शरद कुडे, आनंद खरात, लालू यादव, बाबा नैताम, मनीषा मोरे, रवीकुमार ढेंगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, संदीप कामडी, सुरेश कोरवार, रुपेश घोरपडे व ब्ल्यूटी साखरे यांनी केली. blackmail threat to expose personal information extortion
पत्रकारिता क्षेत्रात गुन्हेगारांची एंट्री
चंद्रपूर जिल्ह्यात प्रामाणिक पत्रकार हे नियमित आपले काम करतात मात्र काही वर्षांपासून या क्षेत्रात गुन्हेगार शिरले असल्याने ते पत्रकारिता क्षेत्राला कलंकित करण्याचे काम करीत आहे, यामध्ये काहीजण खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात गेले आहे, काहींवर एट्रोसिटी, खुनाचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, वाळू तस्करी असे अनेक गुन्हे दाखल आहे, ज्यांना बातमी काय असते याचा अर्थच माहित नसतो ते या क्षेत्रात येत अवैध वसुली करीत आहे. Police arrest news reporters extortion gang
यापूर्वी सुद्धा अश्या घटना
वर्षभरात मूल तालुक्यात स्वतःला पोलीस असल्याची बतावणी करून काही पत्रकारांनी पत्नीसमवेत एकाला खंडणी मागितली होती. त्या पत्रकाराच्या टोळक्याने स्वतःला गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगितले होते.










