sand smuggling arrest Gondpipri । गोंडपिंपरी पोलिसांची धडक कारवाई! अवैधरित्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

sand smuggling arrest Gondpipri

sand smuggling arrest Gondpipri : गोंडपिंपरी २२ नोव्हेम्बर (News 34) – गोंडपिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा राळापेठ येथे दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर आणि रेतीसह एकूण ₹ ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Read Also : भंगार चोरणारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नाकाबंदीत ट्रॅक्टर पकडला

पोलीस स्टेशन गोंडपिंपरी येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मौजा राळापेठ परिसरातून ट्रॅक्टरद्वारे अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने राळापेठ येथे नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान, MH 34 CR 3382 क्रमांकाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर अवैधरित्या, कोणत्याही प्रकारच्या आवश्यक परवान्याशिवाय रेतीची वाहतूक करताना आढळून आला.

चालक-मालकावर गुन्हा दाखल

पोलिसांनी तात्काळ ट्रॅक्टर चालक तथा मालक सुनील भैयाजी ताजने (वय ५०, रा. राळापेठ, तालुका गोंडपिंपरी) यास ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹ ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात खालील वस्तूंचा समावेश आहे.

  • महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली: अंदाजे किंमत ₹ ५,००,०००/-
  • १ ब्रास रेती: अंदाजे किंमत ₹ १०,०००/-
  • एकूण जप्त किंमत: ₹ ५,१०,०००/-

अवैध रेती वाहतुकीप्रकरणी आरोपीविरुद्ध गोंडपिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment