village leaders joining BJP in Chandrapur । जोरगेवारांच्या नेतृत्वावर विश्वास; शेनगाव-सोनेगावातील महिला व युवकांचा भाजपात प्रवेश

village leaders joining BJP in Chandrapur

village leaders joining BJP in Chandrapur : चंद्रपूर १५ नोव्हेम्बर (News३४) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेनगाव येथील सरपंच पुष्पाताई मालेकर, संभाजी ब्रिगेड आणि कॉंग्रसच्या कार्यकर्त्यांसह अनेक महिला व युवकांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले.

Read Also : कांग्रेसने चंद्रपूर मनपा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराकडून मागविले अर्ज

यावेळी विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, महामंत्री श्याम कनकम, सविता दंढारे, तालुका अध्यक्ष विनोद खेवले, युवा मोर्चा अध्यक्ष आशिष वाढई, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, गौरव गोहणे, गौरव ठावरी, मनोज जाधव यांची उपस्थिती होती.

मोठ्या संख्येने झालेल्या या प्रवेशामुळे तालुक्यातील भाजपाची संघटनशक्ती आणखी बळकट झाल्याचे चित्र दिसून आले. शेनगाव येथील सरपंच पुष्पाताई मालेकर यांच्यासह सुवर्णा बोबडे, शिवानी मडावी, लता मालेकर, कमलाबाई ताजने, मीरा मासिरकर, सुनीता बादूरकर, मनिषा मासिरकर, कल्पना मेसेकर यांचा पक्षप्रवेश झाला. सोनेगाव येथील स्वप्नील बादुरकर, सोनाली वराट्रे, शुभांगी गोहणे, वैशाली बोबडे, रेखा चटकी, साधना गावडी, नमित गोहणे, स्वप्नील कोराशे, नामेश येरगुडे, गणेश काकडे, विकास गोहणे, गणेश बोबडे, अतुल पिंगे, स्वप्नील जोगी यांचा तसेच महाकुर्ला येथील रोशन भोयर, कुणाल भोयर, मनोज बोधे, हितेश वाटेकर, ओम भोयर व रजित बोबडे यांचा भाजपात प्रवेश झाला. village leaders joining BJP in Chandrapur

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आज शेनगाव, सोनेगाव आणि महाकुर्ला येथील मोठ्या संख्येने महिला, युवक आणि सरपंचांनी भारतीय जनता पक्षावर ठेवलेला विश्वास हा आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नसून विकास, पारदर्शकता आणि सामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी लढणारी सशक्त लोकशाही चळवळ आहे.

ते पुढे म्हणाले, आपल्या प्रत्येक गावाच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चंद्रपूर तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांत आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आणि पुढेही त्यात वाढ करत राहू. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि युवा वर्गाला संधी देण्यासाठी भाजपा योग्य ते निर्णय घेत आहे, असेही ते म्हणाले.

  पक्षाच्या विकासाभिमुख कामावर, तसेच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासातून हा प्रवेश झाल्याचे जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांनी सांगितले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

Leave a Comment