Warora Latest Crime News । बँकेतून पैसे काढले अन्… वरोरा चिकन मार्केटजवळील चोरीचा थरार

Warora Latest Crime News

Warora Latest Crime News : वरोरा १९ नोव्हेम्बर (News३४) – वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत १७ नोव्हेम्बर रोजी बँकेतून काढलेले १ लक्ष ४० हजार रुपये दुचाकी वाहनाच्या डिक्कीतून अज्ञाताने लांबवीले, मात्र पोलिसांच्या तपासचक्राने अवघ्या ३ तासात आरोपीला अटक करण्यात आली.

Also Read : रक्तरंजित प्रेमकहाणी, विवाहित महिलेच्या पतीची प्रियकराने केली हत्या

१७ नोव्हेम्बरला फिर्यादी ४५ वर्षीय सुनील वासुदेवराव घाटे राहणार हनुमान वार्ड यांनी चिकन मार्केट जवळील बँकेतून १ लक्ष ४० हजार रुपये काढत ते मोपेड वाहनाच्या डिक्कीत ठेवले, त्यानंतर यात्रा वार्डातील हॉटेल मध्ये घाटे गेले, काही वेळाने ते परत आले असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने डिक्कीत ठेवलेली रक्कम लांबवली.

याबाबत घाटे यांनी वरोरा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली, तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले, परिसरातील सीसीटीव्ही तपासत इतर तांत्रिक पद्धतीने अवघ्या ३ तासाच्या आता आरोपी राजू लिंगन्ना इंद्रपवार राहणार यात्रा वार्ड याचा शोध घेत त्याला अटक केली, चोरी गेलेली रोख रक्कम आरोपी कडून जप्त करण्यात आली. Warora Latest Crime News

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात सपोनि शरद भस्मे, पोलीस कर्मचारी संदीप मुळे, महेश गावतुरे, विशाल राजूरकर व व्यापारी संजय शेंडे, अनिकेत पुरी, प्रमोद लोंडे व जयंत ठमके यांच्या मदतीने केली.

Leave a Comment