illegal weapons crackdown : बल्लारपूर ८ डिसेंबर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात एकाच आठवड्यात ३ देशी कट्टे पोलिसांच्या कारवाई दरम्यान मिळाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे सदर कट्टे हे एकट्या बल्लारपूर शहरात पोलीस कारवाईत जप्त करण्यात आले आहे.
७ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना एक युवक स्वतःजवळ अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी बल्लारपूर ते सास्ती जाणाऱ्या रोडवरी कब्रस्तान जवळ एक संशयास्पद असलेला इसम आढळला, पोलीस पथकाने त्या इसमाला ताब्यात घेतले. (हे वाचा – बल्लारपुरात दोन बंदुकी जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांची कारवाई)
३२ वर्षीय सलमान उर्फ राज सलीम खान राहणार भगतसिंग वॉर्ड बल्लारपूर असे त्या युवकाचे नाव, पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता एक लोखंडी अग्निशस्त्र ज्याची लांबी १९.५ सेमी व बॅरेलची लांबी हि १५ सेमी होती. किंमत एकूण ८ हजार रुपये. गुन्हे शाखेच्या पथकाने सलमान वर पुढील कारवाईसाठी बल्लारपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. बल्लारपूर पोलिसांनी आरोपीवर भारतीय हत्यार कायदा अन्व्ये गुन्हा दाखल करीत अटक केली. illegal weapons crackdown
बल्लारपुरात स्थानिक युवक देशी कट्टे, पिस्टल हे आता फॅशन म्हणून वापरायला लागले आहे, नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी तरुण एक नवा उच्छाद या माध्यमातून मांडत असल्याचे चित्र आहे, अजूनही अनेकांकडे विनापरवाना शस्त्र असल्याची माहिती आहे. एकाच आठवड्यात गुन्हे शाखेने २ तर बल्लारपूर पोलिसांनी १ अग्निशस्त्र जप्त केले आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी सचिन गुरनुले, जय सिंग, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, शेखर माथनकर, दिनेश अराडे यांनी केली.
