‘हा गडचांदूरच्या स्वाभिमानाचा विजय’ – निलेश ताजने

BJP Rebel Victory : चंद्रपूर / गडचांदूर २१ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – वोटचोरी चा आरोप असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात नगरपरिषद निवडणुकीत भाजपला जनतेने नाकारत अपक्ष व कांग्रेस पक्षाला कल दिला आहे. राजुरा नगरपरिषदेत कांग्रेसने पुन्हा मुसंडी मारत विजय मिळविला तर गडचांदूर नगरपरिषदेत भाजपचे बंडखोर निलेश ताजने हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले. (साडेआठ लाखाचे कर्ज आणि वसूल केले ३१ लाख, चंद्रपुरात पुन्हा एका सावकारांवर गुन्हा दाखल)

गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार निलेश ताजने यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. शेतकरी संघटनेसह युती करून ‘शहर विकास आघाडी’ स्थापन करत ताजने यांनी नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवार रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत निलेश ताजने यांनी तब्बल २ हजार मतांची आघाडी घेत नगराध्यक्षपदावर विजय मिळवला. BJP Rebel Victory

विजयानंतर प्रतिक्रिया देताना ताजने म्हणाले की, “हा विजय गडचांदूरच्या स्वाभिमानाचा आहे. अहंकार वाढलेल्या नेत्यांचा अहंकार गडचांदूरच्या जनतेने मोडीत काढला असून जनतेने मला भरभरून आशीर्वाद दिला.” यावेळी त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांना अप्रत्यक्ष टोला लगावत राजकीय अहंकारावरही भाष्य केले. या निकालामुळे गडचांदूरच्या राजकारणात मोठा बदल घडल्याचे चित्र असून अपक्ष आघाडीच्या विजयाने सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का बसला आहे.

Leave a Comment