चंद्रपूर मनपा निवडणूक: प्रभाग १६ मधून रुपेश पांडे यांची दावेदारी

Chandrapur Election Candidate : चंद्रपूर २६ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – चंद्रपूर मनपा निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवार प्रभागात मोर्चेबांधणी करीत नागरिकांची मते जाणून घेत आहेत, या मोर्चेबांधणीत सामाजिक कार्यकर्ते रुपेश पांडे यांनी हिंदुस्थान लालपेठ कॉलरी प्रभाग क्रमांक १६ मधून दावेदारी सादर केली. (भाजपकडून निवडणूक प्रमुख पदी किशोर जोरगेवार)

वर्ष २०१७ मध्ये रुपेश पांडे यांनी बाबुपेठ प्रभागातून शिवसेना पक्षातर्फे निवडणूक लढवीत प्रथमच ६०० च्या वर मते प्राप्त केली होती, पराभव झाल्यावर सुद्धा पांडे यांनी आपले सामाजिक कार्य सुरु ठेवले, प्रभागातील अनेक नागरिकांच्या आपल्या कार्यालयामार्फत समस्या जाणून घेत त्याचे निराकरण केले.

तरुण व सुशिक्षित पिढी ला राजकारणात संधी मिळावी याकरिता मतदार आग्रही आहे, रुपेश पांडे यांचं नाव आता प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिक पुढे करू लागले आहे. प्रभागातील समस्येची जण असलेल्या रुपेश पांडे हाच नगरसेवक पदावर असावा असे मत मतदार प्रत्यक्ष बोलू लागले आहे. Chandrapur Election Candidate

मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले होते, यंदा आरक्षणाने अनेकांचा हिरमोड केला असल्याने दिग्गजांचा पत्ता यावेळी कट झाला असल्याने प्रभाग क्रमांक १६ मध्ये एससी महिला व एसटी महिला व सर्वसाधारण गटाचे आरक्षण घोषित झाले, असून सर्वसाधारण गटातून रुपेश पांडे यांनी आपलं नाव पुढे केले आहे. कोणत्या पक्षातून ते निवडणूक लढणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मतदारांना आता नवा चेहरा हवा व त्या चेहऱ्यात रुपेश पांडे हवा अशी मागणी आता मतदारांकडून जोर धरू लागली आहे.

Leave a Comment