Chandrapur leopard attack : चंद्रपूर १८ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आज १८ डिसेंबर रोजी सकाळी मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पदमापूर बीटात बांबू कटाई करणाऱ्या मजुरांवर बिबट्याने हल्ला करीत ठार केले. मानव वन्यजीव संघर्षातील हा चालू वर्षातील ४५ वा बळी होता. जिल्ह्यात आतापर्यंत ४० वाघाच्या हल्ल्यात, ३ बिबट, अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात १ असे एकूण ४५ नागरिकांचा बळी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गेला आहे. (चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक, आरक्षणाचा घोळ कायम)
आज सकाळी ८.३० वाजेदरम्यान पदमापूर बीटात अडेगावातील कक्ष क्रमांक १८१ मध्ये बांबू कटाई करताना ६३ वर्षीय साहजू चमरू बिलठेरिया या मजुरांवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करीत ठार केले. घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस व वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे घटनास्थळी दाखल झाले. मृतक हा मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यातील रहिवासी होता. Chandrapur leopard attack
घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले, मृतकाच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये देण्यात आले. या घटनेनंतर परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहे.
