चंद्रपुरात भाजप प्रवेशावर आरोप-प्रत्यारोप; बेलखेडेंनी शिवसेना जिल्हाप्रमुखांचे आरोप फेटाळले

Chandrapur political controversy : चंद्रपूर १९ डिसेंबर २०२५ (News३४) – पत्नीला नोकरी मिळाली त्या बदल्यात सिनेट सदस्य युवासेना विभागीय सचिव यांनी शिवबंधन तोडत भाजपात प्रवेश केला असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केला आहे. गिर्हे यांच्या दाव्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले, मात्र हे सर्व आरोप बिनबुडाचे आहे असे प्रतिउत्तर निलेश बेलखेडे यांनी News३४ सोबत बोलताना दिले. (नोकरीच्या बदल्यात भाजपात प्रवेश, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हेचा खळबळजनक दावा)

चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवशी शिवसेना ठाकरे युवासेनेचे विभागीय साची व सिनेट सदस्य यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. पक्षातील घुसमट असे कारण त्यांनी सांगितले मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी पत्नीला मध्यवर्ती बँकेत नोकरी दिल्याने त्या उपकाराचे कर्ज फेडण्यासाठी बेलखेडे भाजपात गेले असा दावा केला.

आरोप फेटाळले

यावर निलेश बेलखेडे यांनी News३४ सोबत बोलताना म्हटले कि शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांनी जो दावा केला तो अत्यंत चुकीचा व बिनबुडाचा आहे, माझं मी सुशिक्षित कुटुंबातून राजकारणात सक्रिय झालो, माझी पत्नी आपल्या योग्यतेमुळे नोकरीवर लागली, राजकारण आलं कि आरोप प्रत्यारोप होतात मात्र कुटुंबावर आरोप करणे हे चुकीचे आहे.

मी स्वतः इंजिनिअर असून प्राध्यापक आहो, शिवसेना ठाकरे पक्षात मी अनेक वर्षांपासून होतो, पक्ष वाढीस माझं काही प्रमाणात योगदान नाही असे म्हणने चुकीचे आहे, मात्र मागील ५ वर्षांपासून पक्ष अत्यंत दुर्बल परिस्थिती मध्ये आला आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील एनडी हॉटेलमध्ये शिवसेनेची बैठक संपर्क प्रमुख यांच्या उपस्थित झाली. निवडणुकीत नियोजनाबाबत मी काही सुचविण्याचा प्रयत्न केला मात्र माझा सर्वांसमोर अपमान करण्यात आला. Chandrapur political controversy

अपमानाचा हा प्रकार अनेक वर्षांपासून सतत सुरु आहे, याबाबत मी पक्षश्रेष्ठीला पुराव्यानिशी तक्रार दिली होती पण काही सुनवाई झाली नाही, त्यामुळे सतत होणारा अपमान व पक्षातील घुसमट याला कंटाळून मी भाजपात प्रवेश केला. अपमान व घुसमटीचे कारण मी सुशिक्षित यासह आजपर्यंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकवर्गाचे अनेकांचे प्रश्न मी सोडविण्यात यशस्वी झालो, त्यामुळे जिल्ह्यातील नेतृत्व धोक्यात तर आलं नाही ना याची जाणीव स्थानिक नेतृत्वाला झाल्याने माझे अपमानसत्र सुरु झाले, मागील ५ वर्षांपासून शिवसेनेला गळती सुरु झाली, कार्यकर्त्यांचा अपमान करणे यामुळे अनेकांनी शिवबंधन तोडले, मी भाजपात आलो तर शिवसेना जिल्हाप्रमुखाला काय बोलावे हे सुचले नसेल म्हणून माझ्या कुटुंबावर आरोप करण्याचा त्यांनी केविलवाणा पोकळ प्रयत्न केला अशी प्रतिक्रिया निलेश बेलखेडे यांनी दिली.

देशात सुरु असलेल्या राजकारणात आज सुशिक्षित लोकांची गरज आहे अशी मागणी मतदार स्वतः करीत आहे मात्र राजकारणात सुशिक्षित असलेल्याना साधं विचारलं जात नाही अशी अवस्था देशातील राजकारणाची झाली आहे.

Leave a Comment