भाजपला चंद्रपुरात बळकटी; माजी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये

Congress Leader Joins BJP : चंद्रपूर २३ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) : नगीनाबाग, चंद्रपूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात काँग्रेसचे माजी पदाधिकारी विनोद संकत यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात पार पडला. (आमदार जोरगेवार यांच्या पत्रावरून चंद्रपुरात राजकीय महाभारत)

    पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण, निर्णायक नेतृत्वावर तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विकासाभिमुख व लोकहितकारी कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे विनोद संकत यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजप हा देश व राज्याच्या विकासाचा खरा आधारस्तंभ असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करणारा पक्ष असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, राजकारण हे पदासाठी नव्हे, तर जनतेच्या सेवेसाठी असते. विकासाची स्पष्ट दिशा, प्रामाणिक नेतृत्व आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अखंडपणे काम करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी. आज काँग्रेसचे माजी पदाधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणे, हे आमच्या कार्याची आणि जनतेच्या विश्वासाची पावती आहे. Congress Leader Joins BJP

  चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कोणताही पक्षभेद न ठेवता काम करत आहोत. जे विकासाच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी भाजप हे खुले व्यासपीठ आहे. नव्याने प्रवेश करणारे सर्व कार्यकर्ते पक्ष संघटन मजबूत करतील आणि जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहोचविण्यात मोलाचे योगदान देतील, याची मला खात्री आहे. या प्रवेशामुळे परिसरातील भाजप संघटन अधिक बळकट होणार असून, पक्षाच्या कार्याला नवी ऊर्जा मिळणार असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment