ब्रम्हपुरी वनवृत्तात भीतीचं वातावरण; वाघ-बिबट हल्ल्यांवर नियंत्रणासाठी स्मार्ट तंत्रज्ञानाची गरज – वडेट्टीवार

Human Wildlife Conflict Control : ब्रम्हपुरी २० डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – ब्रम्हपुरी वनवृत्त अंतर्गत मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला असून यात अनेक नागरिकांचा हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात निष्पाप बळी गेला. तर ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील वनालगतच्या गावातील शेतकरी, शेतमजूर, पायवाटसरु, सायकलस्वार शाळकरी मुले,मार्गक्रमण करणारे वाहतूकदार हे संभाव्य घडणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांमुळे प्रचंड भयभीत झाले आहेत. अशा मानव – वन्यजीव संघर्षाच्या घटनांना प्रतिबंध घालण्या हेतू ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज असल्याचे मत विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी विभागीय वनाधिकाऱ्यां समवेत पार पडलेल्या बैठकीत व्यक्त केले.  (सावकाराना नियम पाळण्याचे जिल्हाधिकारी गौडा यांचे आदेश, अन्यथा कारवाईला तयार रहा) Human–Wildlife Conflict Control

आयोजित बैठकीस मुख्य वनसंरक्षक रामानुजम, ब्रम्हपुरी उपवनसंरक्षक कुमार स्वामी, वनाधिकारी विकास तडसे प्रामुख्याने उपस्थित होते.

Human–Wildlife Conflict Control वर प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक

उपरोक्त बैठकीत विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात तसेच परिसरात आजवर घडलेल्या वन्यप्राणी हल्ला व त्यातून झालेली जीवितहानी याबाबत उपयोजनात्मक कार्यवाही संदर्भात बोलतांना म्हणाले की, आजवर झालेल्या घटनांमध्ये वाघ व बिबट हल्ल्यांचे प्रमाण अधिक आहेत.यावर प्रतीबंधित उपाययोजना म्हणून इलेक्ट्रिक स्मार्ट स्टिक, हिंस्त्र प्राण्यांच्या गळ्यात कॉलर टाकने जेणेकरून जीपीएस प्रणालीद्वारे लोकेशन जाणून हल्ले थांबवीता येणार,

वनलगतच्या गावांना चेनलिंग फेनिसिंग द्वारे गाव सीमेला सुरक्षा प्रदान व्यवस्था करणे, सौर दिवे, अत्याधुनिक रिमोट कंट्रोल यंत्रातील ट्रॅप पिंजरे लावणे यासह अनेक उपाय योजना करणे गरजेचे आहे. सोबतच सिंदेवाही,एकारा भूज या वनामध्ये सफारी प्रकल्पास मंजुरी देऊन येथे पर्यटन विकासासह रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. वनलगतच्या शेती मध्ये वन्यप्राण्यांनी धुडगूस घालून केलेल्या नासधूस पिकांची वेळीच नुकसान भरपाई करणे, वन्यप्राणी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मृतकाच्या कुटुंबियांतून एका व्यक्तीस शासकीय सेवेत नोकरीची संधी, ही महत्वपूर्ण बाब देखील उपरोक्त बैठकीत वनविभाग अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत वनविभाग अधिकाऱ्यांनी मानव – वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी पुढाकार घेऊन विविध उपाय योजना लवकरच कार्यान्वीत करण्यात येईल अशी माहिती दिली.

Leave a Comment