बल्लारपुरात पोलिसांची धांय धांय कारवाई

Illegal Arms Raid in Ballarpur : चंद्रपूर 6 डिसेंबर (News34) – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका गुन्हेगारीचे हब बनू पाहत आहे, काही महिन्यापूर्वी बल्लारपुरातील सूर्यवंशी टोळीने शस्त्रसाठा चंद्रपुरात आणत मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होते, पोलिसांनी त्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती, मात्र त्यानंतर सुद्धा बल्लारपूर शहरात बंदुकीचा वापर काही थांबत नाही आहे. (हे वाचा : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नी व प्रियकराकडून हत्या)

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांच्या कारवाईत २ कट्टे व जिवंत काडतूस सह २ आरोपीना अटक करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पहिल्या कारवाईत

५ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली कि एक इसम स्वतःजवळ देशी कट्टा बाळगून फिरत आहे, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक पंडित दीनदयाल वॉर्ड येथे पोहोचले.

दीनदयाळ वॉर्डातील पेपरमिल कॉलोनी पडित क्वार्टर परिसरात ३९ वर्षीय राहुल दिनेश डंगोरे ला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीची जुनी वापरती देशी कट्टा आढळून आला. Illegal Arms Raid in Ballarpur

आरोपी डंगोरे वर भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, या कारवाईत ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, पोलीस कर्मचारी स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, किशोर वैरागडे, गोपीनाथ नरोटे, किशोर वाकाटे, शेखर माथनकर व रिषभ बारसिंगे यांनी केली.

बल्लारपूर पोलिसांच्या कारवाईत

रेल्वेनगर वॉर्डात एक इसम आपल्या घरी देशी बनावटीची पिस्टल बाळगून असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या इसमाच्या घराची झडती घेतली असता ७ MM बोर देशी बनावटीची पिस्टल मॅगझीन सह दोन जिवंत काडतूस आढळून आले.

देशी बनावटीची पिस्टल व २ जिवंत काडतुसे

रेल्वे नगर वॉर्डातील ३० वर्षीय मोहम्मद इस्माईल उर्फ नवाब युसूफ शेख वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा ट्रान्सपोर्ट व्यवसायी आहे. भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपी शेख ला अटक करण्यात आली.

या कारवाईत देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतुसे असा एकूण १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

बल्लारपूर पोलिसांच्या कारवाईत पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, सपोनि शब्बीर पठाण, पोलीस कर्मचारी रणविजय ठाकूर, सुनील कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, खंडेराव माने व गुरु शिंदे यांचा सहभाग होता.

स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांनी या कारवाईत एकूण १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Leave a Comment