Illegal Money Lender : ब्रह्मपुरी २० डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या मिंथुर गावातील रहिवासी रोशन कुडे यांनी गायीच्या उपचारासाठी सावकाराकडून १ लक्ष रुपये घेतले होते, मात्र सावकारांनी रोशन कडून तब्बल ४८ लक्ष रुपये वसूल केले इतकेच नव्हेतर रोशन कुडे ला कर्ज फेडण्यासाठी किडनी विकायला भाग पाडले, या प्रकरणानंतर जिल्हा प्रशासन हादरून गेले त्यांनी सावकार नियमाला डावलून व्यवहार करीत असेल तर तात्काळ प्रशासनाला तक्रार द्यावी असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर ब्रह्मपुरी येथील सावकार पीडित व्यक्तीने पोलिसात सावकाराच्या अन्यायाची कहाणी सांगत पोलिसात तक्रार दिली. (सावकाराच्या जाचापायी शेतकऱ्याने किडनी विकली)
फिर्यादी हा सिटी ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये काम करतो, लोकांचे पैसे द्यायचे असल्याने फिर्यादीने सावकार लक्ष्मण पुंडलिक उरकुडे यांच्याकडून ८ लक्ष ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र साडेआठ लक्ष रुप्याचे फिर्यादीने सावकार उरकुडे यांना सोन गहाण, मुथूट मनी, नातेवाईक व घर गहाण ठेवत तब्बल ३१ लक्ष ४२ हजार ६०० रुपये दिले.
मात्र त्यानंतर सुद्धा सावकार उरकुडे पैश्याचा तगादा फिर्यादीकडे लावीत होते, अश्यातच जिल्ह्यात सावकाराच्या अन्यायाचे प्रकरण उघडकीस आले, प्रशासनाने नागरिकांना सावकार नियमाना डावलून व्यवहार करीत असले तर तक्रार करा असे आवाहन केले होते, प्रशासनाच्या आवाहनाला साद देत सावकार लक्ष्मण उरकुडे यांच्या विरोधात तक्रार फिर्यादीने तक्रार दिली. ब्रह्मपुरी पोलिसांनी सावकार विरुद्ध ३९, ४४ महाराष्ट्र सावकारी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. Illegal Money Lender
चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले कि जर कुणी अवैध सावकार आपल्या कडून मुद्दलाच्या अव्वाच्या सव्वा व्याज आकारत असेल व आपल्या कुटुंबाचा छळ करीत असेल तर याबाबत चंद्रपूर जिल्हा नियंत्र कक्ष क्रमांक ११२ किंवा ७८८७८९०१०० वर माहिती द्यावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
