१ लक्ष रुपयाच्या कमिशनपोटी विकल्या १२ किडन्या

Kidney selling racket : चंद्रपूर २३ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – राज्याला हादरविणाऱ्या शेतकरी किडनी विक्री प्रकरणात पोलिसांना यश मिळाले असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कमिशनच्या हव्यासापोटी हे काम करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. रोशन कुडे या शेतकऱ्याने सावकाराकडून १ लक्ष रुपयाचे कर्ज घेतले होते, रोशन ने १ लक्ष रुपयाचे तब्बल ४८ लाख सावकाराना दिले होते. त्यानंतरही सावकाराचा जाच न संपल्याने रोशन ने स्वतःची किडनी विकली होती. अटक करण्यात आलेल्या डॉ क्रिष्णा बनावट नाव त्याचे खरे नाव ३५ वर्षीय रामकृष्ण सुंचू असून तो सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. (पीडित शेतकऱ्याची बच्चू कडून यांनी घेतली भेट,३ जानेवारीला नागभीड शहर बंद)

नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातील रोशन कुडे याने गायीच्या उपचारासाठी १ लक्ष रुपयाचे कर्ज सावकाराकडून घेतले, मात्र त्यावरील व्याजाचा डोंगर वाढला आणि १ लक्ष रुपयाचे रोशन ने तब्बल ४८ लक्ष रुपये सावकारांना दिले, यांनंतरही सावकाराचा त्रास काही संपत नसल्याने रोशन ने कंबोडिया या देशात जाऊन स्वतःची किडनी ८ लक्ष रुपयांना विकली.

फेसबुकवरून किडनी डोनर पेज आणि डील

किडनी विकून कर्ज फेडावे असा विचार मनात आल्यावर रोशन ने फेसबुक वरील किडनी डोनर पेज ची संपर्क साधला यामधून आरोपी सूत्रधार रामकृष्ण सुंचू याची ओळख झाली. रामकृष्ण ने आपले खरे नाव न सांगत स्वतःचे नाव डॉ. क्रिष्णा आहे व तो चेन्नई मधील निवासी असल्याचे भासविले. Kidney selling racket

विशेष बाब म्हणजे रामकृष्ण याच्यावर कर्जाचा डोंगर होता त्याने कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी ८ लक्ष रुपयाला विकली, त्यानंतर किडनी विक्री टोळीचा तो एजंट बनला. रामकृष्ण ने आतापर्यंत उत्तर भारतातील तब्बल १२ नागरिकांच्या किडन्या कंबोडियातील Preah Ket Mealea Hospital, Phnom Penh, Cambodia मध्ये विकल्या असल्याचे कबूल केले आहे. या मोबदल्यात त्याला एका किडनीवर १ लक्ष रुपयांचे कमिशन मिळत होते. रामकृष्ण हा अभियंता आहे. मात्र पैश्याच्या लालसेपोटी तो हे काम करायचा. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढणार अशी माहिती पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली आहे. सावकाराच्या जाचात अडकलेल्या शेतकऱ्याची किडनी विक्री प्रकरणी पोलिसांनी कलम १८, १९ मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

चंद्रपूर पोलिसांनी ६ सावकारांवर गुन्हे दाखल केले असून या प्रकरणी आतापर्यंत ५ आरोपी सह किडनी विक्री प्रकरणात १ असे ६ जणांना अटक केली आहे. किडनी विक्रीचे हे रॅकेट संपूर्ण देशात कार्यरत असून चंद्रपूर पोलीस यामागील सूत्रधारांच्या मागावर असून पोलिसांचे पथक आता पश्चिम बंगाल मध्ये गेले आहे.

Leave a Comment