मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेत e-KYC अंतिम करण्याची अंतिम संधी!

Mukhyamantri Ladaki Bahin : चंद्रपूर, दि. १७ डिसेंबर २०२५ (News३४) : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील / पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावी व त्यानंतरच पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करावी. सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पध्दतीने करावयाची आहे. (हे आहे चंद्रपुरातील सोलर गाव)

या योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या Web Portal वरील e-KYC प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने अंतिम करणे आवश्यक असल्याने त्या Web Portal वर आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने या पात्र लाभार्थी महिलांनी योजनेच्या Web Portal वर भेट देवून e-KYC प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने अंतिम (पूर्ण) करण्यात यावी. Mukhyamantri Ladaki Bahin

सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पुर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील, तर अशा लाभार्थ्यांना पुनःश्च योजनेच्या Web Portal वर e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची एक अंतिम संधी (One Time Edit Option) 31 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तथापि, ही संधी शेवटची असणार आहे. त्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्याचा पर्याय उपलब्ध होणार नसल्याने काळजीपूर्वक माहिती भरण्यात यावी. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी त्वरीत प्रक्रीया पूर्ण करावी, असे आावाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे.

Leave a Comment