नागभीडमध्ये अवैध सावकारीचा कळस; कर्जफेडीसाठी किडनी विक्री

Nagbhid illegal moneylender case : चंद्रपूर १६ डिसेंबर २०२५ (News३४) – जिल्ह्यातील नागभीड तालुका गाव मिंथुर मध्ये राहणार ३६ वर्षीय रोशन शिवदास कुळे काम दुग्ध व्यवसाय, रोशन हा दुग्ध व्यवसाय करीत त्याचेजवळ १२ दुभत्या गायी होत्या मात्र वर्ष २०२१ मध्ये लंपी आजाराने गाईंना ग्रासले, उपचार केला मात्र सुधार होईना, गाईच्या पुढील उपचारासाठी रोशन ने सावकार मनीष पुरुषोत्तम घाटबांधे जवळून २ फेब्रुवारी २०२१ ला १ लक्ष रुपये व्याजाने घेतले. मात्र व्याजाचे चक्र वाढत गेले, सावकारांचा तगादा वाढला, कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज घेण्यात आले. मात्र सावकाराचा जाच काही कमी होईना अखेर रोशन ने आपली किडनी विकली, सावकाराना पैसे दिले मात्र पुन्हा पैश्याचा तगादा लावला, अखेर रोशन ने याबाबत पोलीस अधीक्षकांना १० नोव्हेम्बर २०२५ रोजी निवेदन दिले मात्र कारवाई काही झाली नाही. (चंद्रपुरात जिवंत माणसाला कागदावर केले मृत)

वृत्तवाहिनीने रोशन वर घडलेल्या प्रसंगाचे वृत्त प्रकाशित केल्यावर जिल्हा प्रशासन जाग झालं आणि सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ब्रह्मपुरी पोलिसांनी सावकार मनीष घाटबांधे, किशोर रामभाऊ बावनकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे, प्रदीप रामभाऊ बावनकुळे, संजय विठोबा बल्लारपूरे व सत्यवान रामरतन बोरकर यांच्यावर गुन्हे दाखल करीत अटक केली. मात्र किडनी विक्रीबाबत पोलीस प्रशासन चौकशी करीत आहे. Nagbhid illegal moneylender case

१ लक्ष रुपयाचे कर्ज आणि फेडला डोंगर

रोशन कुळे यांनी माहिती दिली कि हि सुरुवात १ लक्ष रुपयांच्या कर्जाने झाली, वेळेवर पैसे परत न केल्याने मला शिवीगाळी करीत मारहाण करण्यात आली. ते कर्ज चुकविण्यासाठी बाहेरून पैसे दिले, मात्र पुन्हा १ लक्ष रुपये बाकी आहे असा तगादा लावला त्यानंतर सुद्धा पैसे दिले मात्र सावकार पुन्हा पैश्याची मागणी करीत होते. वारंवार पैसे दिल्यावर सुद्धा सावकारांनी रोशन चा पाठलाग सोडला नाही. सावकारांच्या पैश्याची परतफेड करण्यासाठी रोशन ने स्वतःची किडनी विकली. ती सुद्धा कंबोडिया या देशात जाऊन.

किडनी विकून पैसे दिले मात्र सावकाराचे पैश्यासाठी तोंड काही बंद होत नव्हते, याबाबत रोशन ने १० नोव्हेम्बर २०२५ रोजी पोलीस अधीक्षकांना निवेदन स्वरूपात तक्रार दिली असता मात्र कारवाई काही झाली नाही. रोशन ची दखल वृत्तवाहिनीने घेतल्यावर प्रशासनाला अखेर त्या अवैध सावकारांवर कारवाई करावी लागली. याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक म्हणाले कि फिर्यादी रोधन कुळे यांनी १ लक्ष रुप्याचे कर्ज फेडण्यासाठी सावकारांना जवळपास ५० लक्ष रुपये दिले. याबाबत सर्व व्यवहाराचे पुरावे मिळाले आहे. किडनी विकल्याबाबत सध्या चौकशी सुरु आहे.

Leave a Comment