तरुण नेतृत्व वैभव ठाकरे यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

Shiv Sena party joining : चिमूर १९ डिसेंबर २०२५ (News३४) – चिमूर तालुक्यातील तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपसरपंच वैभव ठाकरे यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली, चिमूर विधानसभा संपर्कप्रमुख दीपक दादा कदम यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला. (रेकी करून बंद घरात चोरी, परराज्यातील आरोपीला अटक)

यावेळी उपजिल्हा प्रमुख अमित आखाडे, विधानसभा प्रमुख श्रीहरी सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडल्याने कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले. या प्रवेशामुळे चिमूर तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे.

पक्षप्रवेशावेळी वैभव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची भूमिका मांडली. गावागावातील विकासकामे, युवकांना रोजगार व संधी तसेच शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Shiv Sena party joining

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैभव ठाकरे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली. आगामी काळात पक्षवाढ व संघटन बळकटीकरणात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना चिमूर तालुका प्रमुख (शहर) सुधाकर निवटे, भास्कर शिंदे, बाळकृष्ण पांडव, समीर बल्की आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment