Shri mata mahakali mahotsav : चंद्रपुरात 7 ऑक्टोबर पासून 5 दिवसीय महाकाली महोत्सवाचा होणार शुभारंभ

Shri mata mahakali mahotsav श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट तर्फे 5 दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन 7 ते 11 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Shri mata mahakali mahotsav यंदा महाकाली महोत्सवाचे 3 रे वर्ष असून यंदा विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा उपस्थित राहणार आहे.
मागील 3 वर्षांपासून नवरात्रला आराध्य दैवत महाकाली माता मंदिराच्या प्रांगणात महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

महत्त्वाचे : निवडणुकीपूर्वी चंद्रपूर पोलीस दलात मोठे फेरबदल

7 ऑक्टोबर रोजी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजता जैन मंदिर संस्था व सराफा असोसिएशनच्या वतीने श्री माता महाकालीच्या चांदीच्या मूर्तीची शोभायात्रा शहरात काढण्यात येणार आहे. Shri mata mahakali mahotsav


शोभायात्रा नंतर 51 फूट उंचीच्या महाकाली महोत्सव ध्वजाचे ध्वजारोहण झाल्यावर महाकाली मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यावर महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.


यावेळी आयोजित महोत्सवात आरोग्य शिबिराचे उदघाटन, चित्र प्रदर्शीनी, गायत्री कोतपल्लीवार तर्फे देवीचे नव स्वरूप यावर संगीतमय प्रवचन असे विविध कार्यक्रमानंतर सायंकाळी 6 वाजता भजन गायक अनुप जलोटा यांचे भजन. Shri mata mahakali mahotsav


8 ऑक्टोबर रोजी 999 जेष्ठ माय-माऊलींचा सन्मान सोहळा, नृत्य जल्लोष, जागर कवितेचा, राम आयेंगे राम आयेंगे या गाण्याची प्रसिद्ध गायिका स्वाती मिश्रा यांचे भक्तिमय संगीत कार्यक्रम, 9 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम यामध्ये सायबर सेल तर्फे महिलांना मार्गदर्शन, महाकाली आरती, मेरा भोला है भंडारी या गाण्याचे गायक हंसराज रघुवंशी यांचा भक्तिमय कार्यक्रम.
10 ऑक्टोबर रोजी महाकाली महोत्सवातील स्वयंसेवकांचा सन्मान सोहळा, सायंकाळी श्री माता महाकाली नगर प्रदक्षिणा पालखीला प्रारंभ.

विशेष बाब म्हणजे महाकाली महोत्सव काळात जन्म घेणाऱ्या मुलींना आयोजकांतर्फे चांदीचे नाणं देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन, नागपूर येथील रिम्पू चंचल आणि पवन ग्रुपच्या वतीने भक्तिमय संगीत कार्यक्रम.
5 दिवसीय महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन व भोजन, लेणं सौभाग्याचं, महिलांना हिरव्या बांगड्यांची भेट, आत्मनिर्भर दुर्गा यांचा सत्कार असे विविध भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन या महोत्सवात होणार असल्याची माहिती आमदार जोरगेवार यांनी यावेळी दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!