Hospital Inspection : चंद्रपूर : केवळ प्रशासनावर वचक न ठेवता रुग्णांचे दुःख समजून घेणारा आणि त्यांच्या अडीअडचणीत मायेची फुंकर घालणारा लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा प्रत्यय आज चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयातील विदारक अवस्था पाहून संतापलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज घेतलेल्या फेरभेटीत एक वेगळेच भावनिक रूप समोर आले. त्यांनी ओ.पी.डी. सह थेट आय.सी.यू. (ICU) वार्ड गाठत प्रत्येक खाटापाशी जाऊन रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची अत्यंत आस्तेने विचारपूस केली.
खासदार महोदयांनी थेट संवाद साधत अनेकांच्या वेदना समजून घेतल्या आणि त्यांच्या समस्या जागच्या जागीच निकाली काढल्या. खासदारांनी दाखवलेल्या या आपुलकीमुळे रुग्णांना आणि त्यांच्या हताश नातेवाईकांना मोठा भावनिक धीर मिळाला. या फेरभेटीदरम्यान रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे आणि जिल्हा वैद्यकीय शल्यचिकित्सक इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Hospital Inspection
काही दिवसांपूर्वी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रुग्णालयाला दिलेल्या अचानक भेटीत रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होत असल्याचे समोर आले होते. जिल्ह्याचे तापमान ४५ अंशांच्या पार असतानाही रुग्णांच्या नातेवाईकांसाठी साधे कुलर नसणे, पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था आणि कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी गायब असणे, अशा गंभीर बाबी उघडकीस आल्या होत्या. तसेच, स्वच्छतेवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असूनही महिला प्रभागातील तुंबलेली स्वच्छतागृहे, फुटलेल्या नाल्या आणि पसरलेले घाणीचे साम्राज्य पाहून खासदारांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. महिलांच्या आरोग्याशी होणारी तडजोड कदापि सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी परिस्थिती सुधारण्यासाठी ८ दिवसांची मुदत दिली होती; अन्यथा रुग्णालयातच बसून उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. Hospital Inspection (कांग्रेसचे नगरसेवक ५ लाखात विकल्या गेले – आमदार वडेट्टीवार))
चंद्रपूर GMC मधील रुग्णांच्या समस्यांवर Hospital Inspection खासदारांनी कोणते निर्देश दिले?
खासदार धानोरकर यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर रुग्णालय प्रशासनाने युद्धपातळीवर काम करत त्रुटी दूर करण्यास सुरुवात केली. आज खासदार महोदयांनी रुग्णालयाला पुन्हा भेट देऊन केलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली असता, प्रशासनाने बहुतांश व्यवस्था सुरळीत केल्याचे दिसून आले. पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागल्याने त्यांनी प्रशासकीय प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. Hospital Inspection
याच वेळी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेले स्वच्छतागृह अजूनही अपूर्ण असल्याचे दिसताच, खासदार धानोरकर यांनी थेट मनपा आयुक्तांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व सदर बांधकाम तात्काळ पूर्ण करून ते सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यावर आयुक्तांनीही येत्या काही दिवसांतच हे स्वच्छतागृह नागरिकांसाठी खुले करण्याची ग्वाही दिली.
रुग्णांची गैरसोय पूर्णपणे दूर व्हावी यासाठी खासदार धानोरकर यांनी प्रशासनाला आणखी काही महत्त्वपूर्ण आणि कडक सूचना केल्या आहेत. चंद्रपूरच्या कडक उन्हाचा त्रास रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना होऊ नये, यासाठी रुग्णालयाच्या आवारात तातडीने ‘हिरवी नेट’ लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर कायमस्वरूपी उत्तम व्यवस्था उभारण्यात यावी आणि रुग्णालयातील बंद असलेले सर्व एसी (AC) व कुलर तात्काळ दुरुस्त करून सुरू करण्यात यावेत, जेणेकरून उन्हाच्या तीव्रतेपासून सर्वांचे रक्षण होईल. रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेपर्यंत आपले रुग्णालयाच्या कारभारावर बारीक लक्ष राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. Hospital Inspection
या पाहणी दौऱ्याप्रसंगी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष शिवा राव, महिला व बालकल्याण सभापती संगीता भोयर, झोन ३ सभापती रामनरेश यादव, ए. आय. पी. सी. जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, नगरसेवक सुरेंद्र अडबाले, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक अजय बल्की, नगरसेवक राहुल चौधरी, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेविका सुनंदा धोबे, नगरसेविका वैशाली महाडोळे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार, निसार शेख, प्रतिभा पेंदाम, स्वप्नील कांबळे, शहजाद शेख, अतुल वाघमारे, आशिष बोन्डे, अतुल पिंपळकर, प्रवीण अधिकारी, गुंजन येरमे, राज यादव, मोनू रामटेके, अनिल सुरपाम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






