LCB Bhadravati Raid मध्ये 650 ग्रॅम गांजा जप्त

“गुप्त माहिती मिळताच LCB ने टाकला छापा आणि घरातून सापडला 650 ग्रॅम गांजा!”

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 19, 2026

भद्रावती: LCB Bhadravati Raid अंतर्गत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने भद्रावती शहरातील गुरुनगर भागात मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताच्या घरावर छापा टाकून 650 ग्रॅम गांजा आणि मोबाईल जप्त केला. या कारवाईत गुरुदास उर्फ चेतन भास्कर पोइनकर याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. (सोळाशे मीटर तार चोरला, पोलिसांनी २४ तासात पकडले)

चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला पुन्हा एकदा मोठे यश आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने भद्रावती शहरात धडक कारवाई करत गांजाची विक्री करणाऱ्या एका तरुणाला रंगेहात अटक केली आहे. भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुनगर भागात ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीच्या घरातून ६५० ग्रॅम अमली पदार्थ गांजा आणि मोबाईलसह एकूण १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

LCB Bhadravati Raid मध्ये जप्त झालेला मुद्देमाल

या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला भद्रावती येथील गुरुनगर परिसरात एका घरात मोठ्या प्रमाणावर गांजा साठवून त्याची विक्री केली जात असल्याची अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती. या खात्रीशीर माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुनगर येथील संशयित आरोपी गुरुदास उर्फ चेतन भास्कर पोइनकर (वय २३ वर्षे, रा. गुरुनगर, भद्रावती) याच्या घरावर अचानक छापा टाकला.

पोलिसांनी पंचांसमक्ष घराची कसून झडती घेतली असता, त्यांच्या हाती ६५० ग्रॅम वजनाचा गांजा लागला, ज्याची बाजारातील अंदाजे किंमत ६ हजार रुपये आहे. यासोबतच पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेला १० हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन असा एकूण १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपी गुरुदास उर्फ चेतन पोइनकर याला तातडीने अटक केली आहे.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या संपूर्ण रॅकेटमध्ये त्याचा आणखी एक भागीदार सामील असल्याचे समोर आले असून, इशांत मानकर (रा. भद्रावती) असे या फरार झालेल्या पाहिजे असलेल्या साथीदाराचे नाव आहे. याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा, १९८५ च्या संबंधित कलमांनुसार अप. क्र. ६५०/२०२६, कलम ८(क), २०(ब) (ii)(a), २९ NDPS Act अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या पथकाने केली असून, फरार आरोपी इशांत मानकर याच्या अटकेसाठी पोलिसांनी चक्र फिरवली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment