Ayushman Card Camp अंतर्गत चंद्रपूरच्या विठ्ठल मंदिर वॉर्डातील नोंदणी शिबिर

चंद्रपूरच्या विठ्ठल मंदिर वॉर्डात आयुष्मान कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 25, 2026

चंद्रपूर : Ayushman Card Camp अंतर्गत चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डात आयोजित नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ५०० हून अधिक लाभार्थ्यांनी यशस्वीरित्या नोंदणी केली. पात्र कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार विमा मिळणार असून, ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी १० लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. (खासदार प्रतिभा धानोरकरांचे रिपोर्ट कार्ड बघितलं का?)

Ayushman Card Camp अंतर्गत ५०० नागरिकांची नोंदणी

गोरगरीब व गरजू कुटुंबांना हक्काचे आरोग्य कवच मिळवून देण्याच्या उद्देशाने शहरातील विठ्ठलमंदिर वॉर्डात  आयोजित करण्यात आलेल्या आयुष्मान कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. या विशेष शिबिराच्या माध्यमातून ५०० पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी आपली नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण करून या सुवर्ण संधीचा लाभ घेतला. सदर शिबीर राधा पुलगमकर यांच्या आयोजनात १५ जून ते २० जून २०२६ या कालावधीत अभ्यंकर शाळेजवळ, विठ्ठल मंदिर वार्ड येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात पार पडले.

या शिबिरात नोंदणी झालेल्या सर्व लाभार्थ्यांच्या आयुष्मान कार्डचे काम पूर्ण झाल्यानंतर, लवकरच एका विशेष कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या शुभहस्ते या कार्डांचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे.

या शिबिराअंतर्गत सर्वसामान्य पात्र रेशनकार्ड धारक कुटुंबांना प्रति कुटुंब ५ लाख रुपयांचा मोफत उपचार विमा, तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष १० लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया राबवण्यात आली. गंभीर आजारांच्या उपचारासाठी सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक ओढाताण होऊ नये, या प्रामाणिक हेतूने खासदार महोदयांच्या प्रेरणेने हे पाऊल उचलण्यात आले होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आयोजक राधा पुलगमकर यांच्यासह त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील सर्व सहकारी, तंत्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले असून नागरिकांनी या सुविधेबद्दल खासदार कार्यालय आणि आयोजन समितीचे मनापासून आभार मानले आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment