Rajura Missing Boy प्रकरणातील रामपूर अनाथ बालगृहातील बेपत्ता मुलगा

राजुरा रामपूर अनाथ बालगृहातून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 25, 2026

राजुरा: Rajura Missing Boy प्रकरणामुळे राजुरा तालुक्यात खळबळ उडाली आहे. रामपूर येथील स्वामी विवेकानंद अनाथ बालगृहातून १२ वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाला आहे. मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.

येथील रामपूर भागातील स्वामी विवेकानंद अनाथ बाल गृहातून एक १२ वर्षीय अल्पवयीन मुलगा कोणालाही काहीही न सांगता अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अनाथ बाल गृहाचे अधीक्षक राकेश गंगाधर मडावी (वय २७ वर्ष) यांनी राजुरा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (बनावट कर्ज मंजुरीचा मॅसेज आणि लाखोंची फसवणूक)

Rajura Missing Boy प्रकरणामुळे परिसरात खळबळ

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी राकेश मडावी हे गेल्या १ सप्टेंबर २०२५ पासून रामपूर येथील स्वामी विवेकानंद अनाथ बाल गृहात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या अनाथ आश्रमात एकूण १० मुले वास्तव्यास आहेत. बेपत्ता झालेला १२ वर्षीय मुलगा हा जिल्हा परिषद शाळा रामपूर येथे इयत्ता ६ वी मध्ये शिकत असून, त्याला १३ जुलै २०२२ रोजी बाल कल्याण समिती चंद्रपूर यांच्या आदेशाने या अनाथ आश्रमात दाखल करण्यात आले होते. यापूर्वीही १६ एप्रिल २०२३ रोजी तो कोणालाही न सांगता आश्रमातून निघून गेला होता, तेव्हा तो तेलंगणा राज्यातील वरंगल येथे मिळून आल्याने त्याला पुन्हा आश्रमात आणले गेले होते.

दिनांक २३ जून २०२६ रोजी सकाळी ५:०० वाजताच्या सुमारास आश्रमातीलच एका मुलाने अधीक्षकांना सदर १२ वर्षीय मुलगा अनाथ बाल गृहात दिसत नसल्याची माहिती दिली. यानंतर अधीक्षक मडावी यांनी तात्काळ राजुरा बस स्टॉप, रेल्वे स्टेशन आणि चुनाळा परिसरात त्याचा कसून शोध घेतला, परंतु तो कुठेही आढळून आला नाही. हा मुलगा अल्पवयीन असून त्याला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय अधीक्षकांनी आपल्या तक्रारीत व्यक्त केला आहे.

बेपत्ता मुलाचे वर्णन सावळा रंग, उंची ४.५ फूट, साधारण बांधा, अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पँट, पायात स्लिपर चप्पल आणि पाठीवर कपडे असलेली काळ्या रंगाची कॉलेज बॅग असे आहे. या घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी २४ जून २०२६ रोजी दुपारी १३:२५ वाजता गुन्ह्याची नोंद केली असून, पोलीस उपनिरीक्षक परागकुमार अशोकराव उल्लेवार यांच्याकडे या प्रकरणाचा पुढील तपास सुपूर्द करण्यात आला आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment