Warora Namo Udyan भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थित मान्यवर

वरोऱ्यात विद्यानगरीत ‘नमो उद्यान’ साकार; भूमिपूजनाने विकासाला नवी गती

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 26, 2026

वरोरा : Warora Namo Udyan अंतर्गत वरोरा शहरातील विद्यानगरी परिसरात आधुनिक नमो उद्यान विकसित करण्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. विशेष अनुदान निधी २०२५-२६ मधून हे उद्यान उभारले जाणार असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांसाठी दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. (३० जून रोजी चंद्रपुरात रोजगार मेळावा)

वरोरा नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. विशेष अनुदान निधी २०२५-२६ अंतर्गत विद्या नगरी येथील हाऊसिंग सोसायटीच्या ओपन स्पेस मध्ये ‘नमो उद्यान’ विकसित करण्याच्या कामाचे भव्य भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले.

Warora Namo Udyan प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय आहेत?

वरोरा नगर परिषदेच्या वतीने या भागातील नागरिकांसाठी एक सुंदर आणि सुसज्ज हक्काची जागा निर्माण केली जात आहे. नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि सुंदर सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. विकासाची ही वाटचाल जनतेच्या विश्वासातून अधिक बळकट होत राहील, असा विश्वास याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला. (चंद्रपूर लोकसभेच्या खासदाराचे रिपोर्ट कार्ड बघा)

या महत्त्वपूर्ण विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, उपाध्यक्ष योगिता नेरकर, गटनेते गजानन मेश्राम, नगरसेवक बंडूभाऊ देऊळकर, नगरसेविका वर्षा पिसाळ तसेच परिसरातील इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्या नगरी परिसरातील या ‘नमो उद्याना’मुळे लहान मुलांना खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी आणि सर्वसामान्यांना विरंगुळ्यासाठी एक उत्तम आणि निसर्गरम्य केंद्र उपलब्ध होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले असून आनंद व्यक्त केला आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment