Chandrapur Job Fair employment drive at Mul ITI

👉 नोकरी हवीय? 30 जूनची संधी चुकवू नका!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 25, 2026

चंद्रपूर – Chandrapur Job Fair अंतर्गत मुल येथे 30 जून रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात 150 पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आयटीआय, पदविका आणि पदवीधर उमेदवारांना थेट नोकरीची संधी मिळणार आहे. (चंद्रपूर लोकसभेच्या खासदाराचे रिपोर्ट कार्ड)

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र आणि मा. सा. कन्नमवार शाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल व क्रांतीकारी सुदीराम बोस शाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावली यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जून रोजी सकाळी 10 वाजता पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन मा. सा. कन्नमवार शासकीय प्रशिक्षण संस्था, मुल येथे करण्यात येत आहे.

Chandrapur Job Fair मध्ये 150 पेक्षा अधिक पदांची संधी

            जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आय.टी.आय., पदविका, पदवी इत्यादी उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने, जिल्ह्यातील नामांकीत उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्यादृष्टीने, सदर रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत आहे.

            सदर रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 150 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. या रोजगार मेळाव्या / प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 1) ऑक्सलाईन ह्युमन रिसर्च छ.संभाजीनगर, 2) व्हि.आर. इंटरप्रायझेस, चंद्रपूर, 3) ईगल हायटेक प्रा.लि. चंद्रपूर, 4) इंड्युरंन्स टेक्नालॉजी प्रा.लि., 5) पार्श्व किया, चंद्रपूर इत्यादी कंपन्याचे विविध रिक्त पदे असल्याचे नियोक्ते कडून कळविण्यात आलेले आहे.

मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती) उपस्थित राहावे. तरी अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दुरध्वनी क्रमांक 0712-252295 येथे संपर्क करावा.

            जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याकरीता तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रिक्त पदे अधिसूचीत करण्याबाबत तसेच उमेदवारांनी सदर रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभाग घेण्याकरीता सदर पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment