Chandrapur Job Fair 2026 Organised at Karmavir Mahavidyalaya Mul

चंद्रपूरच्या तरुणांना थेट नोकरीची संधी; १४ ऑगस्टला थेट भरती

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 13, 2026

चंद्रपूर – Chandrapur Job Fair 2026 अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास केंद्र आणि कर्मवीर महाविद्यालय मूळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात नामांकित कंपन्यांच्या २२ पदांसाठी थेट भरती प्रक्रिया राबवली जाईल. (हे हि वाचा – चंद्रपुरातील ६७ भूखंड रद्द)

जिल्ह्यातील 10 वी, आयटीआय पदविका, पदवी इत्यादी उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच जिल्ह्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर आणि कर्मवीर महाविद्यालय, मुल यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता कर्मवीर महाविद्यालय, मुल येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे

            सदर मेळाव्यामध्ये एकूण 22 पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीत्सह (कमीत कमी तीन प्रती उपस्थित राहावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेण्याकरीता पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, यांनी केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment