Chandrapur Nashamukti Abhiyan amdar kishor jorgewar speaking

चंद्रपूर नशामुक्ती अभियानात आमदार जोरगेवार यांचे आवाहन, समाज बचावासाठी संकल्प!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 13, 2026

चंद्रपूर – Chandrapur Nashamukti Abhiyan अंतर्गत तुकुम येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी मार्गदर्शन केले.

नशामुक्त समाज ही काळाची गरज बनली आहे. व्यसनाच्या विळख्यात अडकणाऱ्या युवकांना बाहेर काढणे आवश्यक आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेतला पाहिजे. (हे हि वाचा – चंद्रपुरातील तरुणांना नोकरीची थेट संधी)

आमदार जोरगेवार यांनी तुकुम येथील कार्यक्रमात हे वक्तव्य केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाने या अभियानाचे आयोजन केले होते. उपस्थितांनी नशामुक्त समाजाची प्रतिज्ञा घेतली.

   तुकुम येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत नागरिकांनी नशामुक्त समाजनिर्मितीची प्रतिज्ञा घेतली. यावेळी यावेळी डॉ. सचिन परब, कुंदा बेहन, नरेश, प्रेमकुमार, स्वेता सावलीकर, निरंजन उपस्थिती होती.

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज व्यसनाधीनता ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. नशेच्या आहारी गेल्यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बिकट होत आहे. विशेषतः युवा पिढीला या विळख्यातून दूर ठेवणे ही पालक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. युवकांनी आपल्या ऊर्जेचा उपयोग शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि समाजोपयोगी कार्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

  ते पुढे म्हणाले की, नशामुक्ती हा केवळ एका दिवसाचा संकल्प न राहता ती जीवनशैली बनली पाहिजे. एका व्यक्तीला व्यसनापासून दूर करण्यात यश आले तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. त्यामुळे नशामुक्तीची चळवळ घराघरापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले नशामुक्ती जनजागृतीचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, अशा उपक्रमांना नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असेही सांगितले.

           यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे पदाधिकारी, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी नशेपासून दूर राहण्याची तसेच समाजातील इतरांनाही व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्याची प्रतिज्ञा घेतली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment