Kishor Jorgewar News ज्येष्ठ नागरिक संघ कार्यक्रम चंद्रपूर

चंद्रपूर येथील बाबूपेठमध्ये परिवर्तन ज्येष्ठ नागरिक संघाला दोन वर्षे पूर्ण; आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून आवश्यक सुविधा व निधीची ग्वाही

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 22, 2026

चंद्रपूर –  Kishor Jorgewar News चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची ग्वाही दिली आहे. बाबूपेठ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा व सामाजिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. (हे हि वाचा – चंद्रपुरातील गणेश मंडळासाठी नियमावली जाहीर)

ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभवसंपन्न मार्गदर्शक असून, त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे. शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांच्या आवश्यक सुविधांसाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. भविष्यातही ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

  परिवर्तन ज्येष्ठ नागरिक संघाला दोन वर्ष पूर्ण झाल्या बदल बाबूपेठ येथे  आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांची तसेच अडचणींची आस्थेने विचारपूस केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष प्रदिप किरमे, दिवाकर पूडट्टवार, नगर सेविका लता साव, मुकेश गाडगे, बावणे, शंकर कोल्हे, भोयर आदिंची उपस्थिती होती.

           यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यात अनेक अनुभव घेतले असून, त्यांच्या अनुभवातून नव्या पिढीला योग्य दिशा मिळू शकते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यासोबतच त्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेणे आवश्यक आहे.

             शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विविध ज्येष्ठ नागरिक संघांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन पुढील काळातही आवश्यक सहकार्य केले जाईल. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा, संवाद आणि सामाजिक उपक्रमांसाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठीही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

            बाबूपेठ परिसराच्या विकासासोबतच नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

  कार्यक्रमाला परिवर्तन ज्येष्ठ मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विविध प्रश्नांवर आमदार जोरगेवार यांच्याशी संवाद साधला.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment