Jalnagar Ganja Seizure कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला गांजा व रामनगर पोलीस

चंद्रपूरच्या जलनगरमध्ये गांजा जप्त; श्वान पथकाच्या कारवाईत आरोपीसह ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 26, 2026

चंद्रपूर – Jalnagar Ganja Seizure प्रकरणात चंद्रपूरच्या जलनगर परिसरात रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली. श्वान पथकाच्या मदतीने ०.४८० किलो गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपी भारत राजू मडावी याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (जटपुरा गेट परिसरातील इटनकर पान ठेल्यावर एमडी पावडर जप्त)

शहरात सुरु असलेल्या अंमली पदार्थाच्या तस्करी, वापर व विक्रीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळावे याकरिता पोलिसांसह श्वान पथक सक्रिय झाले आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या श्वान पथकाने गांजा व एमडी पावडर पकडले होते. आता पुन्हा रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा अंमली पदार्थ गांजा पकडण्यात आला आहे.

Jalnagar Ganja Seizure प्रकरणात रामनगर पोलिसांची मोठी कारवाई

२६ जून रोजी जलनगर भागात अंमली पदार्थ गांजा ची विक्री सुरु असल्याची गोपनीय माहिती सपोनि हनुमान उगले यांना मिळाली, माहितीच्या आधारे जलनगर बीएसएनएल कार्यालयाच्या मागील भागात राहणाऱ्या ३८ वर्षीय भारत राजू मडावी याच्या राहत्या घरी पोलिसांनी धाड मारली असता मडावी यांच्या दुचाकी वाहनाच्या डिक्कीत गांजा झाडाचे पाने, फुले बोन्डे व बिया असा ०.४८० किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. आरोपी भारत मडावी वर NDPS अधिनियम अन्व्ये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. (अमरावतीच्या व्यक्तीची चंद्रपुरात हत्या, आरोपीला अटक)

या कारवाईत गांजा सह मोपेड वाहन क्रमांक एमएच ३४ AS ६८०४ असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल रामनगर पोलिसांनी जप्त केला. सदरची कारवाई श्वान पथक चंद्रपूर मार्फत करण्यात आली.

हि यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सपोनि हनुमान उगले, पोउपनि कृष्णा दराडे, आनंद खरात, शरद कुडे, जितेंद्र आकरे, राम नैताम, बाबा नैताम, पंकज, प्रकाश मडावी, संदीप गेडाम, प्रफुल पप्पूलवार, सुरेश कोरवार, मनीषा मोरे व ब्ल्यूल्टी साखरे यांनी केली.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment