चंद्रपूर (पडोली) – padoli Child Abuse Case मध्ये ५ वर्षीय मुलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. पडोली पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपीला तात्काळ अटक केली. ही घटना २६ जून रोजी पडोली पोलीस स्टेशन हद्दीत घडली. मुलगी अपार्टमेंटमध्ये खेळत असताना आरोपीने तिला बिस्कीट आणि आईस्क्रीमचे आमिष देऊन घरी बोलावले. (बाबुपेठ मधील अख्ख कुटुंब समृद्धीवर संपलं)
५ वर्षीय मुलीला आईस्क्रीम चे आमिष दाखवीत अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला पडोली पोलिसांनी अटक केली आहे. हि संतापजनक घटना पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.
Padoli Child Abuse Case : ५ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
२६ जून रोजी पीडित मुलगी अपार्टमेंटच्या आवारात खेळत असताना आरोपीने मुलीला बिस्कीट देत घरी बोलाविले, त्यानंतर मुलीने आपल्या मैत्रणींना बिस्कीट दिले, काही वेळाने आरोपीने मुलीला आईस्क्रीम देतो घरी ये म्हंटले, आता खाऊ भेटणार म्हणून पीडित मुलगी गेली असता त्यावेळी आरोपीने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला.
त्याचवेळी मुलीच्या मैत्रिणीने तिला आवाज दिला असता ती तात्काळ घरी आली व घडलेला प्रकार तिने आपल्या आईला सांगितला. ६५ वर्षीय नराधमाने केलेल्या कृत्यामुळे पीडित मुलीच्या आईने याबाबत घरच्यांना देत माहिती देत पडोली पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरुद्ध तक्रार दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करीत अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






