चंद्रपूर – Chandrapur Samruddhi Accident चंद्रपूर समृद्धी महामार्ग अपघातात बाबुपेठेतील एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले. रविवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. अकोला येथे पदभार घेण्यासाठी निघालेल्या भास्कर जीवने यांच्या चारचाकीने उभ्या ट्रक ला मागून धडक दिली. या भीषण अपघातात महादेव जीवने, लताबाई जीवने, भास्कर जीवने, आरती जीवने आणि जीज्ञा जीवने यांचा जागीच मृत्यू झाला. (चंद्रपूर जिल्ह्यातील २ अल्पवयीन मुले बेपत्ता)
रविवारी २८ जून ला दुपारी बारा वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बाबुपेठ मधील एकाच कुटुंबातील ५ जण ठार झाले. चंद्रपूर वरून अकोला डे चारचाकी वाहनाने अमरावतीच्या दिशेने जात असताना वाहनाने उभ्या ट्र्क ला मागून जोरदार धडक दिली या धडकेत ५ जण जागीच ठार झाले.
Chandrapur Samruddhi Accident : बाबुपेठ कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
मृतकामध्ये ६५ वर्षीय महादेव जिवाजी जीवने, ६० वर्षीय लताबाई महादेव जीवने, ४३ वर्षीय भास्कर महादेव जीवने, ४१ वर्षीय आरती भास्कर जीवने व १२ वर्षीय जीज्ञा भास्कर जीवने सर्व राहणार बाबुपेठ चंद्रपूर यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जीवने कुटुंब अकोला च्या दिशेने समृद्धी महामार्गावरून जात होते, धामणगाव रेल्वेजवळील चॅनेज क्रमांक १०५ रस्त्याच्या कडेला ट्रक NL ०१ AK ७१२३ नादुरुस्त अवस्थेत उभा होता, इतक्यात जीवने कुटुंबाची चारचाकी वाहन क्रमांक MH३४ BF १३४६ त्या लेनवर आली, मात्र चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने कार थेट कंटेनर ला जाऊन धडकली.
धडक इतकी जोरदार होती कि कार चा प्रथमदर्शनी भाग पूर्णतः चक्काचूर झाला. यामुळे कार मधील जीवने कुटुंबातील पाचही सदस्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस व वाहतूक पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. कार मधून मृतदेह बाहेर काढण्यात आले. सदर बाब बाबुपेठ परिसरात पोहोचली असता नागरिकांमध्ये शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, भास्कर जीवने हा भटाळी wcl मधील वर्कशॉप प्रमुख होते, १५ दिवसांपूर्वी त्यांनी पदभार स्वीकारला होता, सोबतच त्यांची पत्नी आरती हि शासकीय नोकरीवर असून त्यांची बदली अकोला मध्ये झाली होती, त्याचा पदभार घेण्यासाठी ते अकोला मध्ये निघाले होते. मात्र वाटेतच काळाचा घाला झाला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






