जिवती – (Jivati Snake Bite Death) जिवती तालुक्यातील लक्ष्मणगुडा येथे विषारी सर्पदंश झालेल्या सहा वर्षीय समीर आत्रामचा उपचारासाठी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी रस्ता नसल्याने गरोदर महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आता पुन्हा एका बालकाचा जीव गेल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्राथमिक उपचार, रेफरल प्रक्रिया आणि रुग्णवाहिकेच्या उपलब्धतेबाबत परस्परविरोधी दावे समोर आले असून गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (बाबुपेठ मधील अख्ख कुटुंब समृद्धीवर संपलं)
काही दिवसांपूर्वी गावात रस्ता नसल्याने गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू झाला होता, रस्ता नसल्याने महिलेच्या घरी रुग्णवाहिका पोहचू शकली नव्हती, या घटनेला १५ दिवशी उलटले नसताना आज २९ जून रोजी ६ वर्षीय मुलाचा रुग्णवाहिका न मिळाल्याने खाजगी वाहनात त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर मुलाला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. (वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, ६ महिन्यात २२ नागरिकांची शिकार)
जिवती तालुक्यातील लक्ष्मणगुडा मधील ६ वर्षीय समीर मारोती आत्राम ला पहाटे ४ वाजताच्या सुमारास मण्यार साप चावला, यावेळी मुलाला अचानक हगवण लागल्याने आजीने त्याला शौचासाठी नेले. काही वेळात आजीच्या अंथरुणावरून मण्यार प्रजातीचा साप गेला, मुलाला झोपेत विषारी साप चावल्याचे समजताच आई-वडिलांनी मुलाला ऑटोत पाटण मधील प्राथमिक उपचार केंद्रात नेले. त्याठिकाणी प्रथमोपचार करण्यासाठी बराच वेळ निघून गेला. वडिलाने सापाचा फोटो दाखवताच त्याला अँटी व्हेनम डोज देण्यात आला.
Jivati Snake Bite Death प्रकरणात नेमके काय घडले?
डॉक्टरांनी रेफर केले मात्र आई-वडिलांकडे वाहनांची व्यवस्था नव्हती, उपचार केंद्रातही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने आत्राम कुटुंबाने मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी वाहनांची जुळवाजुळव केली. चारचाकी वाहनांची व्यवस्था झाल्यावर आत्राम कुटुंब गडचांदूर च्या दिशेने निघाले मात्र रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी समीर ला मृत घोषित केले. रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नसल्याने समीर ला वेळेवर उपचार मिळाला नसल्याने त्याचा मृत्यू झाला. मुलाला गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले पण रेफर चिठ्ठीवर साप चावल्याचा उल्लेख नव्हता अशी माहिती आहे.
या सव्र्ह घटनेवर जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले कि प्राथमिक उपचार केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध होती, कुटुंबाच्या वतीने रुग्णवाहिका नसल्याची बाब कटारे यांनी फेटाळली. सकाळच्या सुमारास रुग्णवाहिका रुग्णाला नेण्यासाठी गेली असेल अशी माहिती त्यांनी दिली.
मुलाला रुग्णवाहिका अभावी उपचार मिळाला नाही, हि बाब प्राथमिक उपचार केंद्राच्या डॉक्टरांनी फेटाळून लावली, आमच्या प्राथमिक उपचार केंद्रात रुग्णवाहिका होती. जर रुग्णवाहिका उपलब्ध होती तर ६ वर्षीय समीर ला रुग्णवाहिकेतून नेण्यात का आले नाही असा गंभीर प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. शासनाद्वारे विकासाच्या गोष्टी केल्या जातात मात्र जमिनीवर सत्यता काही और च आहे. समीर ला वेळेवर उपचार मिळाला असता तर त्याचा जीव वाचला असता, आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे ६ वर्षीय मुलाचा जीव गेला अशी संतापजनक प्रतिक्रिया गावकर्यांनी दिली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






