Tiger Attack sindewahi घटनेनंतर सिंदेवाहीच्या गुंजेवाही जंगलात वनविभाग व ग्रामस्थांची गर्दी दिसत आहे.

Tiger Attack Sindewahi । सिंदेवाहीत तेंदूपत्ता संकलनादरम्यान वाघाचा हल्ला, ४ महिला ठार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 22, 2026

Tiger Attack Sindewahi : सिंदेवाही (चंद्रपूर) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष उफाळून आला आहे, २२ मे रोजी सकाळी गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला, या हल्ल्यात ४ महिला ठार झाल्या असून घटनास्थळी गावकरी व वनविभाग सह पोलिसांची चमू दाखल झाली आहे. (तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला)

चंद्रपूर जिल्ह्यात Tiger Attack Sindewahi घटनांमध्ये वाढ

तेंदूपत्त्याचा हंगाम सुरु होताच, तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गावकरी जंगलात जातात, वाघाच्या कॉरिडॉर मध्ये तेंदुपत्त्यांची झाडे असल्याने नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जंगलात जातात. मागील वर्षी तेंदूपत्ता हंगामात वाघांचे हल्ल्यात वाढ झाल्याने वनविभागाने जंगलात जाऊ नका असे निर्देश नागरिकांना दिले होते. Tiger Attack Sindewahi

मात्र वनविभागाचे निर्देश चुकवीत पहाटे नागरिक जंगलात जात तेंदूपत्ता संकलन करीत आहे, आज २२ मे रोजी सकाळच्या सुमारास काही महिला गुंजेवाही च्या जंगलात गेल्या होत्या, तेंदूपत्ता गोळा करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांवर हल्ला केला, या हल्ल्यात ४ महिला जागीच ठार झाल्या या हल्ल्यात ४ महिला जागीच ठार झाल्या असून त्यामध्ये ४५ वर्षीय कवडूबाई दादाजी मोहुर्ले, ४० वर्षीय अनिताबाई दादाजी मोहुर्ले, ५० वर्षीय संगीता संतोष चौधरी व ३८ वर्षीय सुनीता कौशिक मोहुर्ले यांचा समावेश आहे. महिलांवर एकाच वाघाने हल्ला केला कि अजून वाघ त्याठिकाणी होते याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. वर्ष २०२६ च्या ५ महिन्यात मानव-वन्यजीव संघर्षात एकूण १९ नागरिकांचा बळी गेला आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment