Chandrapur Tiger Conflict मुळे गुंजेवाही गावात शोककळा

Chandrapur Tiger Conflict । गुंजेवाही वाघ हल्ला, ६ दिवसांनी अवतरले पालकमंत्री

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 29, 2026

Chandrapur Tiger Conflict : चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाई येथे 22 मे 2026 रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या चार महिला कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पालकमंत्री अशोक वूईके यांना यायला तब्बल ६ दिवस लागले, मानव वन्यजीव संघर्षातील राज्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले होते, एकाचवेळी ४ महिलांना वाघाने ठार करण्याची हि घटना पहिलीच होती. (वाघाच्या हल्ल्यात ४ महिला ठार)

Chandrapur Tiger Conflict च्या घटना

तेंदूपत्ता हंगाम सुरु झाला, आणि गावकरी पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जाऊ लागले. २२ मे रोजी गुंजेवाही गावातील ७ महिला जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, मात्र काही वेळातच त्यांच्यावर वाघाने हल्ला केला, या हल्ल्यात ४ महिलांचा मृत्यू झाला होता.

राज्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेबाबत साधं सांत्वनपर प्रतिक्रिया राज्याचे वनमंत्री नाईक काढू शकले नाही, ते तर सोडाच स्थानिक आमदार व पालकमंत्री यांना गुंजेवाही चा रस्ता सुद्धा दिसायला वेळ मिळाला नाही. जनप्रतिनिधी किती निष्ठुर असतात ते यावरून दिसतेच.

ब्रह्मपुरी वनविभागाच्या जंगल क्षेत्रात १० वाघ राहू शकतात मात्र त्याठिकाणी ३० वाघांचा वावर असल्याने वाघांचा अधिवास धोक्यात आला आहे, त्यामुळे ते जंगलातून थेट गावाकडे येत आहे, वन्यप्राणी गावात येऊ नये यावर वनविभागाकडे उपाययोजना काही नाही. याबाबत वस्तुस्थिती जाणण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही.

वर्ष २०२५ मध्ये Chandrapur Tiger Conflict ४५ नागरिकांचा जीव गेला होता, विशेष बाब म्हणजे तेंदूपत्ता हंगामाच्या कालावधीत हल्ल्यांचे प्रमाण वाढले होते. पण मागील वर्षीच्या घटनेनंतर वनविभागाने फारसे लक्ष न दिल्याने गुंजेवाही मध्ये ४ महिला वाघाच्या बळी ठरल्या.

मृतक महिला या घरातील कमावत्या होत्या, त्यांच्या जाण्याने कुटुंब उघड्यावर आले आहे, आणि पालकमंत्री व स्थानिक आमदार यांना दुःखाच्या डोंगरात कोसळलेल्या गावकऱ्यांचे सांत्वन करण्यासाठी वेळ नाही. हि लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. मानव-वन्यजीव संघर्ष कसा कमी होणार याच्या उपाययोजना अनेक आहेत मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुणालाही वेळ नाही. वाघाच्या जिल्ह्यातील हि अतिशय दुःखद बाब आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment