चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी (Chandrapur Job Placement Drive) एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील १०वी, १२वी, पदविका आणि पदवीधारकांसाठी विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने १० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नामांकित कंपन्यांमध्ये थेट नोकरी मिळवण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. (रामाला तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पात दिरंगाई, कंत्राटदाराला खडे बोल)
जिल्हातील 10 वी, 12 वी, पदविका, पदवी इत्यादी युवक व युवतींकरीता विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच जिल्हातील उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या हेतूने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूरच्या वतीने 10 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकिय भवन चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.
Chandrapur Job Placement Drive : नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी
सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 39 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 1. श्रीराम फायनान्स चंद्रपूर त्यामध्ये बिझनेस असोसिएट व अप्रेंटशीप, 2. क्राईस्ट हॉस्पिटल, चंद्रपूर त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत स्टाफ नर्स व टेक्निशियन, 3. सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपुर त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत डेटा एंन्ट्री ऑपरेटर उमेदवार भरावयाची असल्याचे या कार्यालयास कळविण्यात आले आहे.
तरी मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी दोन प्रती) उपस्थित राहावे. अधिक माहीतीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172-252295 येथे संपर्क करावा. जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये भाग घेण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.cha
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






