Rajura Fuel Protest : राजुरा – केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीच्या निषेधार्थ राजुरा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. २९ मे) एक भव्य जनआंदोलन छेडण्यात आले. शिवा (देशपांडे) पेट्रोल पंप परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या विविध फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत असून केंद्र सरकार सर्वसामान्यांचे खिसे कापण्याचे काम करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. (हि कसली संवेदनशीलता? ६ दिवसांनी पालकमंत्री पोहोचले गुंजेवाहित)
Rajura Fuel Protest मुळे राजुऱ्यात काँग्रेस आक्रमक
देशातील वाढती महागाई, गगनाला भिडलेले इंधनाचे दर आणि केंद्र सरकारची उदासीनता यांविरोधात आंदोलनकर्त्यांनी परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. Rajura Fuel Protest या दरवाढीमुळे शेतकरी, कामगार, युवक, महिला आणि वाहनधारक अशा सर्वच घटकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून लोकांचे जीवनमान अत्यंत खालावले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्यांनी केली. जनतेच्या या गंभीर प्रश्नावर काँग्रेस पक्ष नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
हे आंदोलन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आले होते. राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या सक्षम नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
आंदोलनाच्या शेवटी, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्यामार्फत देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना विविध मागण्यांचे एक निवेदन सादर केले. या निवेदनात इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती नियंत्रणात आणाव्यात आणि वाढत्या महागाईपासून सर्वसामान्य नागरिकांना त्वरित दिलासा द्यावा, Rajura Fuel Protest अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजनभाऊ लांडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, नगरसेविका संध्या चांदेकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, सेवादल तालुकाध्यक्ष भाष्कर वाटेकर, तिरुपती इंदूरवार, सुरेश पावडे, कोमल फुसाटे, अस्लम चाऊस, विकास देवाळकर, अँड. रामभाऊ देवईकर, अनंतकुमार ताजने, पूनम गिरसावडे, एजाज अहमद, इंदुबाई निकोडे, विनोद झाडे, धनराज चिंचोलकर, भूषण बानकर यांच्यासह युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय आणि सेवादलचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.