युवा सोशल फाउंडेशनतर्फे जुनोनात दिवाळी कपडे व फराळ वाटप

तरुणांनी गरजूंसोबत साजरी केली अनोखी दिवाळी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 9, 2026

चंद्रपूर :- युवा सोशल फाउंडेशन शाखा ऊर्जानगरतर्फे जुनोना गावात दिवाळी उपक्रम राबवण्यात आला. गरजू नागरिकांना नवीन कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, समाजातील वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी करणे हा उद्देश होता. शाखाध्यक्ष वेदांत गेडाम व सदस्य उपस्थित होते. जुनोना गावाच्या उपसरपंचांनी संस्थेचे आभार मानले. संस्था रक्तदान शिबिरे, रुग्णवाहिका सेवा आणि वृक्षारोपणासारखे उपक्रमही राबवते. (चंद्रपुरात काळी दिवाळी, वाचा बातमी)

युवा सोशल फाउंडेशनचा जुनोनातील दिवाळी उपक्रम

दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि एकमेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची पर्वणी. हाच आनंद खऱ्या अर्थाने समाजातील गरीब आणि गरजूपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘युवा सोशल फाउंडेशन’ शाखा उर्जानगरच्या वतीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. फाऊंडेशनच्या वतीने जुनोना गावातील गरजूंना दिवाळीनिमित्त नवीन कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले, आणि समाजातील वंचितांसोबत आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली.

संस्थेचे इतर सामाजिक उपक्रम

युवा सोशल फाउंडेशन ही संस्था नेहमीच लोकहितासाठी कटिबद्ध असून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात अग्रेसर असते. संस्थेमार्फत वेळोवेळी रक्तदान शिबिरे, निःशुल्क रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी मेडिकल कॅम्प, मतदान ओळखपत्र (व्होटिंग कार्ड) शिबिर, वृक्षारोपण, उन्हाळ्यात पाणपोई, तसेच अन्नदान आणि भोजनदान यांसारखे अनेक उपक्रम सातत्याने राबवले जातात. याच सामाजिक दायित्वतून जुनोना गावातील गरजू नागरिकांसाठी या दिवाळी स्नेहसुखाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या आनंदसोहळ्यात युवा सोशल फाउंडेशनचे अनुष भगत, वंश पेरसिंगवार, वंश निकोसे, लावण्यू मुंतमल्ला, रीतिक पाचभाई, हर्षल मेश्राम, तोफिक पठाण, सामाजिक कार्यकर्ते राज नकुल सर, दीपक मडावी, पीयूष नगराडे, शाखा अध्यक्ष वेदांत गेडाम, चेतन नेवारे, हिमांशू नाकाडे, प्रियांशू येरमे, नितीन गरमडे, धीरज मडावी, उत्कर्ष मोंढे, अनिश मोंढे, प्रणय भरडे, अनिकेत नळे, प्रणव दडमल, चिराग नेवारे, विकास ताजणे, नागेश घरत, संकेत ताजणे, ऋग्वेद कोंढेकर, श्रेयस कांडीवार, प्रथमेश अल्टे यांच्यासह सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे जुनोना गावातील गरजूंच्या चेहऱ्यावर दिवाळीचा खरा आनंद पाहायला मिळाला. या समाजोपयोगी व स्तुत्य उपक्रमाबद्दल जुनोना गावाच्या उपसरपंचांनी युवा सोशल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले असून त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment