Sudhir Mungantiwar Birthday Blood Donation Camp Organised By Rahul Pawde

चंद्रपुरात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त १,१२२ जणांचे रक्तदान

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 31, 2026

चंद्रपूर – Sudhir Mungantiwar Birthday Blood Donation अभियानाला चंद्रपुरात नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. माजी भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. (हे हि वाचा – खासदार धानोरकरांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा)

या उपक्रमात तब्बल १,१२२ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. वाढदिवसानिमित्त शहरात वृक्षारोपण, ६३ ठिकाणी महाआरती आणि गरजूंना मदत साहित्य वाटप असे विविध समाजोपयोगी कार्यक्रमही पार पडले.

आ. सुधीर मुनगंटीवार हे केवळ नेते नाहीत, तर आम्हा हजारो कार्यकर्त्यांचा विश्वास, आधार आणि प्रेरणास्थान आहेत. जनसेवा, विकास आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली त्यांची आत्मीयता हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे,” असे प्रतिपादन माजी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष, नगरसेवक श्री.राहुल पावडे यांनी केले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल पावडे यांच्या नेतृत्वात शहरातील विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांना नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

या उपक्रमांतर्गत गिरनार चौक, खेडुले कुणबी समाज भवन, एसटी वर्कशॉप चौक (तुकूम), बंगाली कॅम्प, शासकीय दूध डेअरीजवळ, रयतवारी, उत्तर भारतीय संघ (तुकूम), माता मंदिर (इंदिरानगर, मुल रोड) तसेच लोकसेवा मंगल कार्यालय (पडोली) येथे रक्तदान शिबिरे पार पडली. सर्व केंद्रांवर रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

शहरातील ६३ ठिकाणी महाआरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

रक्तदान शिबिरांसोबतच वृक्षारोपण सप्ताह, शहरातील ६३ ठिकाणी महाआरती, दर्गा येथे गरजूंना ब्लँकेट वाटप, लहान मुलांना रेनकोट वितरण, गरजूंना ताडपत्री वाटप, ११ गावांतील विद्यार्थ्यांना नोटबुक व शालेय साहित्य वितरण, महाकाली मंदिर येथे मसाला भात वाटप, शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात आले.

यावेळी राहुल पावडे यांनी वाढदिवसानिमित्त सेवा, समर्पण आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश प्रत्येक कार्यकर्त्याने कृतीतून समाजापर्यंत पोहोचविल्याचे सांगितले. नागरिक, कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि रक्तदात्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल राहुल पावडे यांनी सर्वांचे आभार मानले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment