Chandrapur Nagarsevak Agitation Rahul Choudhari Protests At MMC

चंद्रपुरात नगरसेवक राहुल चौधरींचे मनपाविरोधात अन्नत्याग आंदोलन; बेकायदेशीर गोदामावर कारवाईसाठी २४ तासांचा इशारा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 31, 2026

चंद्रपूर : Chandrapur Nagarsevak Agitation प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. चंद्रपूर मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात नगरसेवक राहुल चौधरी यांनी ३ ऑगस्ट २०२६ पासून अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आहे.

भानापेठ वार्डातील (प्रभाग क्र. ११) श्री. बंडूजी पेंदुलवार यांच्या दाट निवासी वस्तीत असलेल्या अनधिकृत अगरबत्ती गोदामामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवितास व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी २४ तासांत कागदपत्रे न दिल्यास मनपा इमारतीसमोर उपोषण केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. (हे हि वाचा – सुट्टीच्या दिवशी शेतात गेला, अंगावर कोसळली वीज)

नगरसेवक राहुल चौधरी यांनी २८ जुलै २०२६ रोजी पत्राद्वारे या बेकायदेशीर गोदामासह परिसरातील मालमत्ता क्र. ३४, ३३, १४९५ आणि १६३५ राजू चौधरी, मुन्नालाल चौधरी व छाया चौधरी यांच्या अधिकृत बांधकाम परवानग्या, अग्निशामक विभागाची NOC व मंजुरी नकाशाची कागदपत्रे २४ तासांत उपलब्ध करून देण्याची स्पष्ट मागणी केली होती. मात्र, मुदत उलटूनही मनपा प्रशासनाने यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही किंवा संबंधित माहिती देण्यास पूर्णपणे टाळाटाळ केली आहे.

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे मनपाला तिसरे स्मरणपत्र

या गंभीर प्रकरणात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी देखील २८ जुलै रोजी मनपा प्रशासनाला तिसरे स्मरणपत्र (पत्र क्र. २२०४/२०२६) पाठवून शहरातील इतर नगरसेवकांच्या खासगी व व्यावसायिक इमारतींच्या परवानग्यांबाबत स्पष्टता मागितली होती. परंतु, शहरातील इतर कोणत्याही मालमत्तांची साधी तपासणीही न करता, केवळ राजकीय दबावाखाली येऊन सूडबुद्धीने एकांगी कारवाई करण्याचा प्रयत्न मनपा प्रशासन करत असल्याचा थेट आरोप राहुल चौधरी यांनी केला आहे.

त्यामुळे येत्या २४ तासांच्या आत मनपा प्रशासनाने सदर बेकायदेशीर गोदामावर कायदेशीर कारवाई करावी आणि सर्व अधिकृत कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा सोमवार दि. ०३ ऑगस्ट २०२६ पासून चंद्रपूर शहर मनपा इमारतीसमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले जाईल. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पूर्णपणे चंद्रपूर शहर मनपा प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा राहुल चौधरी यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment