आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना जिवतीत खासदार प्रतिभा धानोरकर आणि सुभाष धोटे

आदिवासी बांधवांसोबत दिवाळी: जिवतीत खासदार धानोरकर, माजी आमदार धोटे सहभागी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 8, 2026

जिवती :– आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करत खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी जिवतीत संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जिवती परिसरातील आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व घटकांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, असे धानोरकर यांनी म्हटले. (चिमुकल्यांसोबत आमदार जोरगेवार यांची दिवाळी, वाचा बातमी)

आदिवासी बांधवांसोबत दिवाळी: जिवतीत नेत्यांचा सहभाग

दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई आणि आनंदाचा उत्सव नव्हे, तर प्रेम, आपुलकी, बंधुभाव आणि माणुसकीची नाती अधिक दृढ करणारा सण आहे. याच भावनेतून काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिवती येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा सण उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात साजरा केला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांशी आत्मीयतेने संवाद साधत सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातून सामाजिक एकात्मता, आपुलकी आणि सर्वसमावेशकतेचा सुंदर संदेश देण्यात आला.

खासदार धानोरकर काय म्हणाल्या?

यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, दिवाळी हा आनंद, प्रेम आणि माणुसकीचा सण आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने आणि आनंदाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे. आदिवासी बांधव हे आपल्या समाजाचा अविभाज्य घटक असून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाचे प्रश्न समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद वाटून घेणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ करणे, हाच या सणाचा खरा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे म्हणाले की, दिवाळीचा खरा आनंद हा समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंदाचा प्रकाश पोहोचविण्यात आहे.

विशेषतः आदिवासी, वंचित आणि ग्रामीण भागातील बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांच्या हक्कांसाठी व सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. समाजातील शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, त्याच्या जीवनात आशेचा नवा प्रकाश निर्माण झाला, तरच दिवाळी साजरी केल्याचे खरे समाधान मिळते. आदिवासी बांधवांशी असलेले हे जिव्हाळ्याचे नाते केवळ सणापुरते मर्यादित नसून त्यांच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ आदिवासी नेते भीमराव पाटील मडावी, लक्ष्मीकांत कोटनाके, सत्तारशह कोटनाके, सुधाकर नागोसे, अमोल कांबळे, माधव डोईफोडे, परशुराम पांचाळ, तजुद्दीन शेख, तिरुपती पोले, गणेश शेठकर, शिवाजी श्रीरामे, गणेश वाघमारे, माधव शेबळे, प्रदीप काळे, शब्बीर पठाण, अकबर शेख, पांडुरंग होंडबे, रवी दुलगुंडे, मनोज अरगेलवार यांच्यासह जिवती परिसरातील आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment