चंद्रपूर : काळी दिवाळी आंदोलन करत वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर शाखेने रविवारी, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन झाले. आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांना शासनाकडून ठोस मदत मिळत नाही. आंदोलनात जिल्हा आणि शहर पदाधिकारी, शेतकरी व नागरिक सहभागी झाले. (खासदार धानोरकरांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी, वाचा बातमी)
महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि कष्टकरी जनतेचे वाढते हाल याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर च्या वतीने रविवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे करण्यात आले.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भाग दुष्काळाच्या छायेत आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पिकांचे नुकसान आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील संकट यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे.
काळी दिवाळी आंदोलन: चंद्रपुरात काय घडले?
मात्र, अशा गंभीर परिस्थितीत राज्य सरकारकडून शेतकरी आणि कष्टकरी जनतेला ठोस मदत मिळत नसून केवळ तुटपुंजी मदत जाहीर करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा केली जाते; परंतु बांधकाम कामगार, पेंटर, कंत्राटी कामगार आणि असंघटित क्षेत्रातील मजुरांना कोणताही ठोस आधार दिला जात नाही. ग्रामीण भागात रोजगार नसल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर च्या वतीने सरकारच्या जनविरोधी व असंवेदनशील धोरणांचा निषेध करण्यासाठी ‘काळी दिवाळी’ आंदोलन पुकारले होते .सदर आंदोलनात कुशल मेश्राम नागपूर जिल्हा प्रभारी व माजी राज्य कार्यकारणी सदस्य, स्नेहदीप खोब्रागडे जिल्हाध्यक्ष पूर्व, कविता गौरकार जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, तनुजा रायपूरे महानगर अध्यक्ष महिला आघाडी,शुभम मंडपे जिल्हाध्यक्ष युवा आघाडी, मधुकर उराडे जिल्हा महासचिव, लीलाधर वंजारी जिल्हा महासचिव,डॉ. अमित नगराळे जिल्हा महासचिव, बंडू ठेंगरे माजी अध्यक्ष महानगर,प्रा.नितीन रामटके,डॉ.प्रज्ञाशील सहारे,ऍड. अक्षय लोहकरे,सुभाषचंद्र डोलने, सुभाष थोरात,मोनाली पाटील, अल्का मोटघरे,किशोर रायपूरे, नारायण कांबळे, धर्मवीर गराडकर, डी.एम.रामटेके, प्रफुल खोब्रागडे आदी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने जिल्हा,तालुका, शहर पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक,शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







